पळशीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी


पळशीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सोशल डिस्टन्स पाळत पळशीसह परीसरातील ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. तालुक्यातील लोणी भापकर, पळशी, मासाळवाडी, आदी परीसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. 

   यावेळी पळशी येथे सरपंच रावसाहेब चोरमले, ग्रामपंचायत सदस्य यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अहिल्यादेवी यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे साध्या पध्दतीने जयंती साजरी करण्यात आल्याची माहिती सरपंच चोरमले यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News