जगावर आलेलं कोरोनाच संकट लवकरात लवकर टळावं यासाठी कोळपेवाडीच्या तरुण मंडळाची अहिल्यादेवींकडे प्रार्थना..


जगावर आलेलं कोरोनाच संकट लवकरात लवकर टळावं यासाठी कोळपेवाडीच्या तरुण मंडळाची अहिल्यादेवींकडे प्रार्थना..

शिर्डी,प्रतिनिधी राजेंद्र दूनबळे

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दरवर्षी ३१ मे ला कोळपेवाडी येथे मोठ्या उत्साहाने सांस्कृतिक कार्यक्रम करत साजरी होत असते. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 15 जून  पर्यंत महाराष्ट्रात लाॅकडाऊन असल्याने यावर्षी कोळपेवाडी  येथे अहिल्यादेवी होळकर यांचा २९६ वी जयंती कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याची माहिती रावण साम्राज्य ग्रुप यांनी दिली आहे. कोळपेवाडी गावामध्ये दरवर्षी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती हजारोंच्या संख्येत होत असते परंतु या वर्षी या ग्रुप ने प्रशासनाला सहकार्य करत व गोरगरिबांना मदत करत ही जयंती मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरी केली. व लवकरच कोरोना संकट गेल्यानंतर तालुक्यातील सर्व फ्रंटलाईन वर्कर यांचा भव्य सत्कार करणार असल्याचे सांगितल. यावेळी रावण साम्राज्य ग्रुप मधील सर्व सदस्य व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News