ए. सी. दिवेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची कोविड सेंटरला नाश्ता सामुग्री भेट


ए. सी. दिवेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची कोविड सेंटरला नाश्ता सामुग्री भेट

विशेष प्रतिनिधी मिलिंद शेंडगे:वरवंड: दौंड तालुक्यातील ए. सी. दिवेकर महाविद्यालय, वरवंड येथील २००५ मधील तृतीय वर्ष विज्ञान बॅचच्या मित्र मैत्रीणी यांनी मिळून तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील दीपगृह कोविड सेंटर मधील रुग्णांना सामाजिक बांधिलकी म्हणून ६ दिवसाच्या नाश्त्याला लागणारा संपूर्ण खर्च एकत्रित करून नाश्त्यासाठी लागणारी संपूर्ण सामग्री तालुक्याचे आरोग्यदूत आमदार राहुल कुल यांच्याकडे सुपूर्द केली. 

     २००५ च्या बॅचमध्ये डी.डी. बारवकर, शरद होळकर, पांडुरंग बावळे, किरण पंडित, नंदकुमार दिवेकर हे उपस्थित होते तर संतोष पवार, धनंजय माने, अतुल जगताप, संजय पवार व मुलींमध्ये अंजली शेळके, सुनीता पोळ, शीतल पाटील, अश्विनी थोरात, ज्योती वाघमारे, सुरेखा बारवकर, रुपाली कामठे, अर्चना शितोळे, कल्याणी दिवेकर, रुपाली दिवेकर, तृप्ती कुलकर्णी यांनी मुंबई, फलटण, पुणे, दौंड, सासवड येथून ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलद्वारे कुल यांच्यासोबत संवाद साधला. तसेच योगेश दिवेकर सध्या आर्मीत असल्याने ते आसाम येथून ऑनलाईन जॉइन झाले होते व त्यांनी आमदारांनी केलेल्या कोविड सेंटरच्या सुविधाबदल आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News