मुर्टीत जगताप कुटुंबाच्या वतीने गरीब व गरजू कुटुंबांना मदत


मुर्टीत जगताप कुटुंबाच्या वतीने गरीब व गरजू कुटुंबांना मदत

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)कोरोनासारख्या जागतिक संकटामुळे राज्यात आर्थिक संकट ओढवलं आहे, तसेच लॉकडाउन असल्यामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत, त्यामुळे गरजू आणि गरीब लोकांना थोडासा हातभार म्हणून सामाजिक बांधिलकीतून मुर्टी गावातील १५ कुटुंबांना सोमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार यांच्या हस्ते १ महिना पुरेल इतका किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

   यावेळी शेलार साहेब बोलताना म्हणाले की, सामाजिक बांधिलकीतून आणि सामाजिक जीवनात वावरताना आपणही समाजाचं काही देणे लागतो ही भावना लक्षात घेत आपल्या आर्थिक बचतीमधून संदेश जगताप आणि मंगेश जगताप यांनी गरीब कुटुंबांना मदत केल्याबद्दल त्यांचे त्यांनी कौतुक केले.

   यावेळी पोलीस हवालदार नितीन बोराडे, होमगार्ड सोमनाथ पवार, असिफ शेख, भाऊसाहेब हुंबरे, विनोद गोलांडे, मुर्टी गावचे उद्योजक संदेश जगताप, मंगेश जगताप व मित्र परिवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संदेश भाऊ जगताप मित्र परिवार यांनी केले होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News