कोरोना मुळे व्यवसाय बंद असलेल्या गरजूंना लिंगाळी ग्रामपंचायत कडून धान्य किट वाटप,


कोरोना मुळे व्यवसाय बंद असलेल्या गरजूंना लिंगाळी ग्रामपंचायत कडून धान्य किट वाटप,

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

-- कोरोना या महामारी मुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे आणि त्यामुळे चेन ब्रेक करण्याच्या हेतूने लॉक डाऊन टाकण्यात आलेला आहे आणि या लॉक डाऊनमुळे छोटे-मोठे व्यवसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा गरजू लोकांना लिंगाळी ग्रामपंचायत तर्फे धान्याचे किट वाटप करण्यात आले, लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीमधील मसनरवाडी,येडेवाडी,जगताप मळा,मेरगळमळा,शाहुनगर (जगदाळे वस्ती) या वाडी वस्तीवर ज्या  आपल्या माणसांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे,ज्यांचे व्यवसाय बंद पडले आहेत अशा ग्रामस्थांना फुलं ना फुलांची पाकळी म्हणुन  ग्रामपंचायतचे सर्वच पदाधिकारी मिळून अन्न धान्य किट वाटपाचा उपक्रम राबविला,यावेळी लिंगाळी ग्रामपंचायत चे सरपंच सुनिल जगदाळे पाटील,उपसरपंच सौ वैजंता सुधाकर चितारे  अँड संदिप येडे ग्रामपंचायत सदस्य संजय येडे.  सचिन हगारे,आशा सेविका मालन येडे. पोलीस पाटील सौ अश्विनी विजय बगाडे या सर्वांनी जनतेच्या दुःखाची कुठेतरी जाण ठेवून सदर स्तुत्य उपक्रम राबवला, समस्त ग्रामस्थांना कोरोना माहामारी विषयी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन अश्विनी बागडे यांनी यावेळी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News