लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे


लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे

श्रीगोंदा प्रतिनिधी : अंकुश तुपे, तालुक्यातील बेलवंडी गाव हे मोठया लोकवस्तीचे व बाजारपेठेचे गाव असुन गावात पिण्याच्या पाण्याची भिषण पाणी टंचाई आहे. पाण्याचे सर्व उद॒भव कोरडे पडले आहे. सध्या कुकडीचे आवर्तन सुटले असुन पिण्याच्या पाण्यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार करूनही पिण्यासाठी पाणी सोडले जात नसल्याने ग्रामस्थांनी श्री. भैरवनाथ महाराज मंदीर येथे सकाळी १० वाजले पासून कोरोना नियमांचे पालन करून उपोषणास   बसले होते सदर उपोषणा मध्ये  तंटामुक्ती चे अध्यक्ष  संग्राम पवार  ग्रा पं सदस्य  सलीम शेख अजित भोसले  संभाजी बेदरे मनसुख शेठ नहार   दिपचंद वायदंडे  अंकुश वाळके  आदींनी सहभाग घेतला


                  बेलवंडी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणेकरीता २०१७ साली महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांचेकडे चिंचणी तळ्यावरून बेलवंडीसाठी बंदीस्त पाईपद्वारे पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे. २०१७ पासून वेळोवेळी सदर योजना मंजुरीकरिता पाठपुरावा करून व वेळोवेळी बदलत्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जिवन प्राधिकरण येथे संबंधित योजनेचे कागदपत्रे दाखल करून अद्याप ही योजनेबाबत कार्यवाही झाली नाही. गावात पिण्याच्या पाण्याची भिषण पाणी टंचाई आहे. पाण्याचे सर्व उद॒भव कोरडे पडले आहे. सध्या कुकडीचे आवर्तन सुटले असुन पिण्याच्या पाण्यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार करूनही पिण्यासाठी पाणी सोडले जात नसल्याने ग्रामस्थांनी श्री. भैरवनाथ महाराज मंदीर बेलवंडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण सुरू केले होते  यावेळी तहसीलदार साहेब  गटविकास अधिकारी  पोलिस निरीक्षक साहेब यांनी सदर उपोषणा स्थळी भेट देऊन ३ दिवासात  गावास टॅऺकर चालू करून देणे बाबत लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले यावेळी मा  संरपच यांनी सर्व अधिकारी व उपोषणास बसलेले सर्व  ग्रामस्थ यांचे आभार मानले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News