बारामती मधील सर्व कोविड १ ९ सेंटर चालवणा-या संस्था हॉस्पीटल चालक मालक यांना महत्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचे नोटीस दयावे तसेच निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार करण्याचे आदेश देण्याबाबत .


बारामती मधील सर्व कोविड १ ९ सेंटर चालवणा-या संस्था हॉस्पीटल चालक मालक यांना महत्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचे नोटीस दयावे तसेच निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार करण्याचे आदेश देण्याबाबत .

बारामती प्रतिनिधी भालचंद्र महाडिक:जनसामान्य नागरीकांच्या व्यथा लक्षात घेवून जनहित याचिका व तक्रार संस्थेच्या वतीने दाखल करतो की , मा . उच्च न्यायालयात मुंबई यांचे समोरील सदर रिट याचिका ( पीआयएल ) कमांक ३१३२/२००४ वर दि . १५ एप्रिल २०० ९ रोजी निर्धन व दुर्बल घटकांतील रूग्णांना वैद्यकीय उपचार मोफत व सवलतीच्या दराने उपलब्ध होण्याचा निर्णय दि . १ सप्टेंबर २००६ पासून महाराष्ट्रात लागू आहे परंतु हॉस्पीटल चालवणा - या संस्था व चालक मालक व्यवसायिक डॉक्टर कोणत्याही आदेशाचे किंवा निर्णयाचे पालन कधीच करताना दिसत नाही . तसेच आता कोविड १ ९ च्या भयानक साथीच्या रोगाच्या आजाराची नोंदणी आकस्मिक आजारामध्ये दि . १७ डिसेंबर २०२० शासन निर्णय क्रमांक वैखप्र -२०२० / प्र.क .६६ / राकावि -२ सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचा झाला आहे . तसेच कोविड १ ९ साथ रोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरीकांना उपलब्ध करून देण्याबाबत दि . २३ मे २०२० शासन निर्णय झाला आहे . पण तरी सुद्धा हॉस्पीटले बेकायदेशीर बिले रूग्णांना देवून लाखो करोडो रूपयांची उलाढाल करताना दिसत आहेत . त्यामुळे बारामती मधील सर्व कोविड १ ९ सेंटर चालवणा - या संस्था हॉस्पीटल चालक मालक यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचे नोटीस दयावे तसेच निर्धन व दुर्बल घटकांतील रूग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार करण्याचे आदेश देण्यात यावे या संदर्भात आपल्याकडे निवेदन दाखल केली आहे . त्यावर आती तत्काल निर्णय दयावा अशी मागणी सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत यांनी मा.उपमुख्यमंत्री साहेब,मा.उपविभागीय दंडाधिकारी सो,मा.धनंजय गाडे यांना केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News