मुर्टीत उपसरपंच किरण जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण


मुर्टीत उपसरपंच किरण जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

बारामती : प्रतिनिधी  (काशिनाथ पिंगळे)

मुर्टी (ता.बारामती) येथील नवनियुक्त उपसरपंच किरण जयसिंग जगदाळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवार दि.२८ मे रोजी मुर्टी गावांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामतीचे नगरसेवक व माजी बांधकाम सभापती अतुल बालगुडे हे होते. 

     मोरगाव निरा रोडच्या दोन्ही बाजूने मान्यवर व ग्रामस्थ यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली. यावेळी नगरसेवक बालगुडे यांनी ५० झाडे दिली. वड, पिंपळ, चिंच, करंज, कडूलिंब अशी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यावेळी १०० झाडांचे ट्रिगार्ड सह नियोजन केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

किरण यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च करण्यापेक्षा वृक्षारोपण करून गाव हिरवं गार करण्याचा संकल्प मित्र व गावातील मंडळे यांनी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

    याप्रसंगी मोरगावचे सरपंच निलेश केदारी, जोगवडीचे सरपंच सुनील सोनवणे, मोराळवाडीच्या सरपंच सारिका नागरगोजे, मोढव्याचे माजी सरपंच हनुमंत बालगुडे, मुर्टीच्या सरपंच मंगल खोमणे, ग्रामपंचायत सदस्य, हरिदास जगदाळे, दिपक जगदाळे, गणेश जगदाळे, विकास खोमणे, धनंजय जगदाळे, प्रशांत जगदाळे, प्रसाद जगदाळे, शुभम जगदाळे, विनोद जगदाळे, रोहित जगदाळे, अविनाश राजपुरे, संकेत जगदाळे, आकाश गायकवाड, अनिकेत तांबे, अक्षय जगदाळे, अमोल जगदाळे, नवनाथ राजपुरे, सुमित जगदाळे, योगेश जगदाळे, प्रशांत राजपुरे,  शिवजयंती उत्सव समिती, किरणभैय्या युवा मंच व तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

सतीश जगदाळे, अतुल बालगुडे, संभाजी होळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर रामदास जगदाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News