मा. पंतप्रधान साहेब यांना दाढी करण्यासाठी शंभर रुपयाची अनिल मोरे यांची भेट


मा. पंतप्रधान साहेब यांना दाढी करण्यासाठी शंभर रुपयाची अनिल मोरे यांची भेट

बारामती प्रतिनिधी भालचंद्र महाडिक:

भारतातील विविध राज्य राज्यातील विविध जिल्हा शहरी ग्रामीण भागातील सर्व परिसरात गेली १५ महिण्यांपासून कोविड संसर्गजन्य विषाणुजन्य रोगराई आजाराचा प्रादुर्भाव राष्ट्रीय संकट आपत्ती आसल्याने तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे कडे योग्य ठोस नियोजन नसल्याने नाहक लोकांना लॉकडाऊन च्या नावाखाली भिखारी बनवून लोकांचे रोजगार उत्पन्न साधने नाहिसे केली आहेत अक्षरशः सर्वोत्परी भारतीयांना देशोधडीला लावले आहे लोकांवर उपसामारीची वेळ आलीय लोकांना जगण्यासाठी दैनंदिन अत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी औषधे उपचार राशनपाणी लाईट बिल विविध शासन प्रशासनाचे कर भरण्यासाठी लोकांकडे छदाम हि न ठेऊन व कुठल्याही प्रकारे पुर्णपणे मदत सहकार्य न करुन भारतीयांची आवस्था अत्यंत बिकट बनवून आपण दाडीचे केस वाढवून काय सिद्ध करु पाहताय वाढवायचे आसतील तर सरसकट मोफत दवाउपचारा करीता मोफत उपचार , मोफत सक्तीने सरसकट कोविड प्रतिबंधक लसीकरण , दवाखान्यांची औषध उपचाराची संख्या गुणवत्ता वाढवा , लोकांच्या फाटक्या पदरात महिण्याचा संपुर्ण घर खर्च भागेल प्रत्येक व्यक् ती प्रत्येक घरटी किमान मासिक रु ३०,००० / - अक्षरी तीस हजार रुपये आर्थिक मदत करण्याचे नियोजन मदत सहकार्य वाढवा , सरसकट सर्व भारतीयांची विद्युत मागील आजवरील थकीत व पुढे सन २०२२ पर्यंतची विद्युत बिले सरसकट माफ करा , लोकांना मोफत घरपोहच सर्व अत्यावश्यक सेवा सुविधा जिन्नस वस्तू पुरवा , ज्या घरात कुटुंबातील दोन वर्षात कोरोना व इतर आजार प्रादुर्भाव रोगराईने व नैसर्गिक मृत्यू झालेल्यांच्या वारसांना सरसकट घरटी रु ५,००००० / - अक्षरी पाच लाख रुपये आर्थिक कुटुंब आत्मनिर्भर आर्थिक मदत सहकार्य साहाय्य द्या.सर्व भारतीयांचे सरसकट सर्व करांची आर्थिक वसूलीत दोन वर्षांची सुट देऊन कर माफी करा , ज्या लोकांचे आजवर सर्व बाजूने नुकसान झालय त्या सर्वांची भरपाई म्हणून किमान सर्व भारतीयांना मागेल त्याला बिन व्याजी दिर्घ मुदतीचे व्याज रहित वित्तपुरवठा कर्जे द्या लोकांना आत्मनिर्भला होण्यासाठी बळ द्या , शासन प्रशासन पोलीस प्रशासनात जिल्हा प्रशासनात सुसुजता गुणवत्ता वाढवा , लघु व इतर उद्दोजक शेतकरी यांना सर्वोत्परी वाढीव सहकार्य करा , कुणाचही शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नका , महागाई पुर्णपणे नियंत्रित करा सर्व जिवनाआवश्यक वस्तूंच्या खाद्यांच्या इंधनांच्या किंमती अत्यंत अल्प कमी करा , औषधांचा काळा बाजार थांबवा सर्व वैद्यकीय उपचार सेवा सर्व घटकातील लोकांना मोफत स्वरुपात द्या , सर्व पातळीवरील शासन प्रशासन पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन सर्व प्रशासनातील नोकर भरती मुक्तपणे सर्व पदे भरुन घ्या , सातत्याने जर का लोकडॉऊन असाचं सारखा सारखा वाढत राहिला तर देशात राज्यात जिल्ह्यात शहरी ग्रामीण भागातील लोक उत्पन्ना पासून वंचित झाल्याने वाम मार्गाकडे वळतील चोरी लुटमार हिसकावने बेकायदेशीर वागण्याचे प्रमाण वाढून अराजकता माजेल  लोकांचा त्रास कमी करा विविध उपाययोजनांची संख्या वाढवा. डोक्यावरचे केस व तोंडावरची दाडी वाढवून साधू सारखा वेशभूषा करुन काय साध्य होणार नाही . आपण जबाबदार प्रथम नागरिक आहात आपल्यावर सर्वांची जबाबदारी आहे राजकारण बनवेगिरी सोडून तुम्ही पहिले दाढी कटिंग करा तुमचं व्यवस्थित टापटिप राहणे महत्त्वाचे आहे तुम्हाला जनउपयोगी असंख्य महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत मार्ग काढायचा आहे सर्व भारतीयांच्या मुळ प्रश्न अडचणी समस्यांकडे आपले पुर्णपणे जाणूनबुजून दुर्लक्ष होत व केले जात आहे सदर बाब अत्यंत गंभीर आहे तुम्ही चहावाले होता मी हि चहावाला आहे म्हणून माझे कडून मी माझ्या कष्टाची कमाई रु १०० / अक्षरी शंभर रुपये फक्त आपणांस पाठवित आहे तुम्ही दाढी कटिंग करुन घ्या हि मी एक भारतीय नागरिक या नात्याने आपणांस विनंती करतो तुमच्यात व भारतीय नागरिकांच्या आवश्यक गरजा यांत सुधारणा करुन सहकार्य करावे हि विनंती . प्रत : अत्यावश्यक कारवाई व माहितीस्तव सर संबंधितांना तातडीने रवाना

जाहिरात
Search
विडिओ
Recent News