पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरीच साजरी करा,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाज बांधवांना संदीपान वाघमोडे यांचे आवाहन


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरीच साजरी करा,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाज बांधवांना संदीपान वाघमोडे यांचे आवाहन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : - पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी कोरोना महामारीमुळे यावर्षी सर्वांनी घरीच साजरी करण्याचे आवाहन संदीपान वाघमोडे यांनी समाज बांधवांना केले आहे,आदरणीय मल्हारराव होळकर.यांची स्नुषा आदरणीय खंडेराव होळकर यांच्या पत्नी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 296 जयंती...

या निमित्त सर्वप्रथम त्यांना अभिमानाने मानाचा मुजरा...

श्री खंडेराव होळकर अतिशय शूर योद्धा होते, कुंभेरीच्या लढाईत त्यांना वीरमरण आले दुर्दैवाने इतिहासात त्यांच्या बद्दल फारशा नोंदी आढळत नाहीत,अहिल्यादेवी यांनी त्यांच्या नंतर अतिशय समर्थपणे राज्य सांभाळले आपल्या कर्तृत्वाचा ठसा सकल जनतेवर उमटविला,आज पण आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत ही त्याचीच साक्ष आहे.. 

या थोर जननी ने दाखविलेल्या मार्गावरून आपण मार्गक्रमण करून आपले आयुष्य सकारत्मक करूयात...

 महाराष्ट्र शासनाने covid-19 चे नियम जे घालून दिलेले आहेत त्याचे पालन करून आपण सर्वजण पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती 31 मे रोजी घरी साजरी करूया असे

संस्थापक अध्यक्ष:श्री.संदिपान वाघमोडे -पुण्यश्लोक महाराणी देवी अहिल्याबाई होळकर जयंती महोत्सव समिती दौंड तालुका व शहर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आवाहन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News