LCB च्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करत सहा महिन्यापासून दरोडयासह मोक्का गुन्हयातील फरारी आरोपी जेरबंद


LCB च्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करत सहा महिन्यापासून दरोडयासह मोक्का गुन्हयातील फरारी आरोपी जेरबंद

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :बारामती येथील गुंड बाळा दराडे टोळीतील व खुनाचा प्रयत्न, दरोडयासह मोक्का गुन्हयातील सुमारे ६ महिन्यापासून फरारी असलेल्या सराईत गुन्हेगारास बारामती येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीसांनी चित्तथरारक पाठलाग करून जेरबंद केल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

       दि.३० नोव्हेंबर २०२० रोजी ०१.०० वा.चे सुमारास मौजे म्हसोबाचीवाडी ता.इंदापूर जि.पुणे गावचे हद्दीत आरोपी नामे १.बाळा पोपट दराडे २.विजय बाळू गोफणे ३.शुभम ओमप्रकाश खराडे व इतर २ अनोळखी आरोपी यांनी फिर्यादी संजय तुकाराम थोरवे रा.म्हसोबाचीवाडी ता.इंदापूर जि.पुणे यांना बारामती शहर, बारामती तालुका व भिगवण या पोलीस स्टेशनला दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याचे कारणावरून फिर्यादी यांचे घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून आरोपी नं. १ ते ३ यांनी त्यांचे हातातील लोखंडी रॉडने व गजाने फिर्यादीचे डोक्यावर, बरगडीवर व पायावर मारहाण करून उशीजवळ ठेवलेले घड्याळ व रोख रक्कम घेतली. तसेच फिर्यादीची पत्नी योगिता हिचा गळा दाबून तिच्या हातातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून तिस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी नं. ४ व ५ यांनी "संज्याला खल्लास करा, जिवंत सोडू नका" असे म्हणून फिर्यादीस मारहाण केली. फिर्यादीचा ओरडण्याचा आवाज ऐकून फिर्यादीचा भाऊ येत असल्याचे पाहून आरोपी नं. १ बाळा दराडे याने त्याचे कमरेला असलेला पिस्टल काढून फिर्यादीचे डोक्याला लावून, "आज वाचला तर पुढच्यावेळी गोळ्या घालील" असे म्हणून पांढर्‍या चार चाकी गाडीत निघून गेले होते. त्याबाबत  फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भिगवण पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, दरोड्यासह आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तपासामध्ये सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) हे वाढीव कलम लावण्यात आलेले . होते. गुन्हयातील आरोपी १.बाळा पोपट दराडे २.विजय बाळू गोफणे यांना यापूर्वी बारामती तालुका पोलीस स्टेशनकडून अटक  करण्यात आलेली आहे. परंतु आरोपी नं.३ शुभम ओमप्रकाश खराडे रा.शेटफळगडे ता.इंदापूर हा सदर गुन्हयात फरार होता.

     सदर गंभीर गुन्हयातील फरारी आरोपी शुभम  खराडे याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथकामार्फत चालू होता. सदर आरोपी हा पोलीसांचे भितीने घरी न राहता भिगवण, इंदापूर व बारामती परिसरात रानावनात ठिकाणे बदलून राहत होता. त्यामुळे तो पोलीसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. 

     दिनांक २८ मे २०२१ रोजी सदर मोक्का गुन्हयातील फरारी आरोपी शुभम खराडे हा पेन्सील चौक बारामती येथे येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाल्याने गुन्हे शाखेचे पथकाने त्या ठिकाणी वेशांतर करून वॉच ठेवला. आरोपी  शुभम ओमप्रकाश खराडे वय २४ वर्षे रा.शेटफळगडे ता.इंदापूर जि.पुणे हा त्या ठिकाणी आला परंतु त्यास पोलीस तेथे असल्याचा संशय आलेने तो पळून जावू लागलेने त्याचा सुमारे  दिड किलोमीटर पाठलाग करून त्यास जेरबंद केलेले आहे.

       आरोपी शुभम खराडे हा बारामती येथील गुंड बाळा दराडे टोळीतील सक्रीय सदस्य व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी बारामती तालुका व भिगवण पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी, खंडणी, गंभीर दुखापत, मारामारी असे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत.

      फरार कालावधीत आरोपी शुभम खराडे याने आणखीन गुन्हे केल्याची शक्यता असून त्याबाबतचा पुढील अधिक तपास बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर व भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने हे करीत आहेत.

     सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News