न्हावरे ता. शिरूर येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी धरमचंद फुलफगर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.


न्हावरे ता. शिरूर येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी धरमचंद फुलफगर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

शिरूर प्रतिनिधी गजानन गावडे:

          शिरूर शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते धरमचंद भवरीलाल फुलफगर यांची रावसाहेबदादा घोडगंगा सहकारी साखर कारखानाच्या (न्हावरे ) तज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली असल्याचे पत्र कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. रंगनाथ थोरात यांच्या हस्ते नुकतेच शिरूर येथे देण्यात आले आहे.

          यावेळी शहरातील व्यवसायिक सतीश धाडीवाल, शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.नंदकुमार निकम,राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे प्रदेश चिटणीस ॲड.शिरीष लोळगे,तालुका अध्यक्ष ॲड.प्रदीप बारवकर,शहर अध्यक्ष ॲड.रविंद्र खांडरे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी लीगल सेल उपाध्यक्ष संजय ढमढेरे,सुनील धाडीवाल,देवल शहा,सुनील बोरा,देवेंद्र फुलफगर,प्रकाश बोरा,राजेंद्र भटेवरा आदि उपस्थित होते.

    गुरूवार दि.२० मे रोजी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची बैठक झाली या बैठकीत शिरूर येथील सामाजिक कार्यकर्ते व सराफ व्यवसायिक धरमचंद भवरीलाल फुलफगर यांची तज्ञ संचालकपदी एकमताने ठरावात निवड करण्यात आली.

        धरमचंद फुलफगर शहरातील प्रसिद्ध सराफ व्यवसायिक असून, शिरूर व पारनेर तालुक्यात पाणीटंचाईच्या काळात सामाजिक बांधिलकीतुन पाण्याचे टँकर,गरीब गरजु व अनाथ विद्यार्थ्यांना तसेच गरीब नागरिकांना मदतीचा हात देण्यात ते नेहमी अग्रेसर असतात.कोरोना काळात सुरू असलेल्या कोरोना रूग्णांच्या शिरूर,पारनेर,श्रीगोंदा तालुक्यातील कोविड केअर सेंटरला त्यांनी भरीव मदत केली आहे.

          शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार,उद्योगपती व शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल,नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांसह शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांमधुन फुलफगर यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News