शेवगाव शेतकऱ्यांनी शेतात जाणे येण्याचे रस्ते, शिव रस्ते, पांदण रस्ते अडवून नयेत. एकमेकांशी चर्चा करून चर्चेने हे प्रश्न सोडवावेत-जि. प. सदस्या सौ. हर्षदा काकडे


शेवगाव शेतकऱ्यांनी शेतात जाणे येण्याचे रस्ते, शिव रस्ते, पांदण रस्ते अडवून नयेत. एकमेकांशी चर्चा करून चर्चेने हे प्रश्न सोडवावेत-जि. प. सदस्या सौ. हर्षदा काकडे

शेवगाव शेतकऱ्यांनी शेतात जाणे येण्याचे रस्ते, शिव रस्ते, पांदण रस्ते अडवून नयेत. एकमेकांशी चर्चा करून चर्चेने हे प्रश्न सोडवावेत. शेतात जाण्यासाठी रस्ते आवश्यकच आहेत असे प्रतिपादन जि. प. सदस्या सौ. हर्षदा काकडे यांनी शेवगाव येथे केले.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण:

सालवडगाव ते जुना माळेगाव रस्त्याचे काम करून तो खुला करून मिळावा असे संदर्भीय निवेदन आज तहसीलदार सौ. अर्चना पागिरे मॅडम यांना देण्यात आले. यावेळी सौ. काकडे म्हणाल्या की, प्रत्येक शेतकऱ्याला शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता हवा असतो. मात्र सर्वांनी एक विचाराने शिव रस्ते, पांदण रस्ते खुले केले पाहिजेत. सालवडगाव ते माळेगाव हा जुना पांदन रस्ता आहे. त्या रस्त्यावर गेली ५०-६० वर्षापासून ६० ते ७० कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील वस्तीवरील लोकांना  दळण-वळणासाठी एवढाच एक रस्ता आहे. त्या रस्त्यावर काही ठिकाणी आपसातच वाद असल्याने रस्त्याचे काम होत नाही सध्या फक्त उन्हाळ्यातच या रस्त्याने जाता येते. पावसाळ्यात व हिवाळ्यात या रस्त्यावर पाणी असते. त्यामुळे सदरचा रस्त्यावरील ५० ते ६० कुटुंबातील शाळकरी विद्यार्थी, आजारी व्यक्ती, वृद्ध नागरिक यांना पावसाळ्यामध्ये गावात येण्यासाठी किंवा दळण-वळणासाठी खूप हाल होतात. सर्वत्र चिखल असतो काही शेतकऱ्यांच्या आपसातील वादामुळे सदरच्या रस्त्याचे काम होत नाही. त्यामुळे सदरच्या पांदन रस्त्याचे काम होऊन सदरचा रस्ता नागरिकांना दळणवळणासाठी शासनाने खुला करावा असेही सौ. काकडे म्हणाल्या. सध्याच्या कोविड  आजारामुळे फक्त तुळशीराम रुईकर व दत्तू भापकर मेजर या दोघांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. निवेदेनावर अण्णासाहेब रुईकर. राजू औटी, अरुण औटी, भगवान म्हस्के, अंकुश म्हस्के, अंबादास कमानदार, संदीप औटी, शरद औटी, गोरक्ष म्हस्के, विठ्ठल भापकर, अरुण लांडे, कृष्णा रुईकर, नाथा भापकर, एकनाथ बोडखे, देविदास लांडे, पंडितराव लांडे, चंद्रकांत औटी इ.सह ६० शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News