रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीतर्फे बोधेगाव येथील ग्रामिण रूग्णालयासाठी दोन संगणक भेट देण्यात आले.


रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीतर्फे बोधेगाव येथील ग्रामिण रूग्णालयासाठी दोन संगणक भेट देण्यात आले.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

शेवगाव रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीतर्फे बोधेगाव येथील ग्रामिण रूग्णालयासाठी दोन संगणक भेट देण्यात आले. शेवगाव येथील ग्रामिण रूग्णालयात गुरूवारी ( दि. २७ ) झालेल्या कार्यक्रमात वैद्यकिय अधीक्षक रामेश्वर काटे यांच्याकडे संगणक सुपूर्द करण्यात आले. रोटरीचे माजी सहप्रांतपाल डॉ. संजय लड्डा, रोटरीचे अध्यक्ष प्रा. किसनराव माने यांच्या पुढाकारातून रोटरीचे सदस्य तथा लाहोटी ज्वेलर्सचे प्रविण लाहोटी यांनी हे संगणक दोन संगणक भेट दिले.

या वेळी डॉ. रामेश्वर काटे म्हणाले, की कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देताना रोटरी क्लबने गेल्या वर्षापासून सेवाभावी भावनेने ग्रामिण रूग्णालयाला खूप मदत केली. मास्क, सॅनिटायझर्स,  औषधे, मंडप सुविधा, ऑक्सिजन सेंट्रल लाईनसाठी मदत त्याच प्रमाणे संगणक अशा अनेक प्रकारची मदत रोटरीने केली. त्यामुळे रूग्णांना सुविधा देण्यासाठी मोठा आधार मिळाला. डॉ. परदेशी यांचेही या वेळी भाषण झाले.

रोटरीतर्फे लसीकरण केंद्रावर मंडप सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल स्वराज मंगल कार्यालयाचे बबनराव म्हस्के यांचा सत्कार या वेळी डॉ. काटे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी रोटरी क्लबचे सचिव बाळासाहेब चौधरी, खजिनदार डॉ. पुरूषोत्तम बिहाणी, प्रा. काकासाहेब लांडे, डॉ. आशिष लाहोटी आदी उपस्थित होते.  सूत्रसंचालन भागनाथ काटे यांनी मानले.

----------------------------------------------------------------

दि. २८ मे २०२१

जाहिरात
Search
विडिओ
Recent News