ओ बी सी मध्ये मराठा समाजाच्या समावेशास बारा बलुतेदार महासंघाचा ठाम विरोध : गायकवाड


ओ बी सी मध्ये मराठा समाजाच्या समावेशास बारा बलुतेदार महासंघाचा ठाम विरोध : गायकवाड

ओ बी सींच्या तीव्र भावनांचे पत्र मुख्यमंत्र्यांना सादर ; आरक्षणाच्या बचावासाठी आंदोलनाचा इशारा 

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत :) सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर मराठा समाजाचा ओ बी सी मध्ये समावेश करून आरक्षण देण्यात आले तर तमाम खऱ्या ओ बी सी बांधवांचे आरक्षण अप्रत्यक्ष पणे हिरावून घेतले जाईल,तसे होऊ नये म्हणून ओ बी सी बांधवांनी संघटित होऊन याला विरोध करावा असे आवाहन ओ बी सी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष माउली मामा गायकवाड यांनी केले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून मराठा समाजाचा ओ बी सी मध्ये समावेश करण्याला विरोध दर्शवून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा विरोध नसल्याचे स्पष्ट म्हंटले आहे. 

कुठल्याही परिस्थितीत ओ बी सींच्या आरक्षणाला धक्का लागत कामा नये अन्यथा सुरक्षित अंतर ठेऊन सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशाराही माउली मामांनी दिला आहे. या निवेदनावर माउली मामा गायकवाड यांच्यासह नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष इंजि.बाळासाहेब भुजबळ,राज्य मीडिया प्रमुख अजय रंधवे, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल इवळे, शहराध्यक्ष शामराव औटी, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश बिडवे, महिला शहर जिल्हाध्यक्ष अनुरिता झगडे, महिला जिल्हाध्यक्षा मनीषा गुरव, उपाध्यक्षा सौ.नवले, नाभिक महामंडळ महिला जिल्हाध्यक्षा वनिता बिडवे, जिल्हा उपाध्यक्षा सुलभा सटाणकर, ओ बी सी बारा बलुतेदार युवा शाखेचे युवाध्यक्ष आर्यन गिरमे, यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या,सदस्यांच्या सह्या आहेत. 

ओ बी सी मध्ये मराठा समावेशा बाबत ठाम विरोध करण्याचा निर्णय महासंघाने घेतला असून याबाबत महासंघ आक्रमक भूमिका घेत आहे. गेल्या ८-१० दिवसात जिल्ह्यातील तमाम ओ बी सी बारा बलुतेदारांशी ऑनलाईन संपर्क करून मुख्यमंत्र्यांना पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर यापुढे महासंघ संपूर्ण राज्यातील ओ बी सी आणि बारा बलुतेदारांसह विविध संघटनांशी संपर्क करणार आहे. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे,ओ बी सी व्ही जे एन टी जनमोर्च्याचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप आपण सर्वांचे नेते मंत्रीमहोदय ना.विजय वडेट्टीवार आणि ना.छगन भुजबळ  आदी नेत्यांचे मार्गदर्शन महासाग घेणार आहे असेही गायकवाड यांनी सांगितले. 

मराठा समाजाचा ओ बी सीत समावेश न करता ओ बी सींचे आरक्षण कायम राहिले पाहिजे या मुद्द्य वर ओ बी सी व्ही जे एन टी जनमोर्च्याचे  शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळांसह अन्य ओ बी सी संघटनांनि आपापली भूमिका स्पष्ट करून आरक्षण बचावाची चळवळ ऑनलाईन सुरु ठेवावी व विरोध प्रकट करणारी निवेदने मुख्यमंत्र्यांना पाठवावीत असे आवाहनही माउली मामा गायकवाड यांनी केले आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News