नगर जिल्हा विश्व हिंदू परिषदे तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन


नगर जिल्हा विश्व हिंदू परिषदे तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

-नगर जिल्हा विश्व हिंदू परिषद व बजरंगदला तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त चौपाटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष अँड जय भोसले,जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,मठमंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे,मुकुल गंधे,जिल्हा समरसता प्रमुख ज्ञानेश्वर मगर,प्रखन्ड मंत्री अनिल राऊत आदी.(छाया-अमोल भांबरकर)    

देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्वपूर्ण योगदान-अँड जय भोसले  

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी कायम अग्रणी राहिलेले असे जहाल मतवादी क्रांतीकारक होते.सावरकरांनी भारतमातेसाठी जन्मठेप काळ्यापाण्याची शिक्षा भोगली.देशासाठी प्रखर अशी देशभक्ती त्याच्या 'ने मजसी ने परत मातृभूमीला।सागरा,प्राण तळमळला' या काव्यपंक्तीतून त्यांचं देशाप्रति असलेलं प्रेम व्यक्त होतं.देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो !आणि या देशाचे आपण देणे लागतो!! देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्वपूर्ण असे योगदान आहे.असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष अँड जय भोसले यांनी केले.                                                      नगर जिल्हा विश्व हिंदू परिषद व बजरंगदला तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त चौपाटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष अँड जय भोसले,जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,मठमंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे,जिल्हा समरसता प्रमुख ज्ञानेश्वर मगर,मुकुल गंधे,प्रखन्ड मंत्री अनिल राऊत आदी उपस्तिथ होते.        

जाहिरात
Search
विडिओ
Recent News