मंचर पोलीस स्टेशन हद्दीत एकाच दिवसात दोन खूनांची उकल,LCB आणि मंचर पोलिसांची संयुक्त कारवाई


मंचर पोलीस स्टेशन हद्दीत एकाच दिवसात दोन खूनांची उकल,LCB आणि मंचर पोलिसांची संयुक्त कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : मंचर पोलीस स्टेशन हद्दीत एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत, एक महिला आणि एका पुरुषाचा  पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचे  पोलिसांनी उघडकीस आणले आहे,या दोन्ही खुनातील आरोपींना 24 तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि मंचर पोलिसांनी मिळून अटक केली आहे, 25 मे रोजी सकाळी 7 वाजता रोहन सतीश जाधव यांनी फिर्याद दिली की त्यांचे चुलते सचिन राजाराम जाधव हे पोदेवाडी तालुका आंबेगाव येथे व्यापाराचे पैसे आणण्यासाठी जातो असे सांगून त्यांच्या वॅगनर गाडी MH 14 HW 3872 या चारचाकी गाडीतुन गेले होते ते परत आले नाही म्हणून हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती,तर दुसऱ्या घटनेत नंदाबई पोपाट केदार यांनी रात्री 10 वाजता तक्रार दाखल केली की त्याची मुलगी सौ द्रौपदीबाई हरिभाऊ गिऱ्हे वय 32 हीचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून तिच्या चेहऱ्यावर,डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तिची हत्या केल्याची तक्रार तिच्या आईने दाखल केली,त्यानुसार मंचर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 341/21 भा द वि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, एकाच दिवसात दोन खुनाच्या गंभीर घटना घडल्या मुळे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदरशनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते यांनी तत्काळ मंचर पोलीस स्टेशनला भेट देऊन काही सूचना केल्या, मंचर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, पोलीस उपनिरीक्षक सागर खोबाले,पो ना नवनाथ नाईकडे,प्रविण गोसावी,आदिनाथ लोखंडे,संजय नाडेकर,दिनेश माताडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे,पो हवा सचिन गायकवाड, काशिनाथ राजापुरे, पो ना दीपक घनवट, अजित भुजबळ, मंगेश ठिगळे,पो कॉन्स्टेबल संदिप वारे, बाळासाहेब खडके,प्रसन्ना घाडगे  यांचे पथक सचिन जाधव  यांच्या तपासासाठी नेमले,तर महिलेच्या खूनाचे आरोपी शोधण्यासाठी पोलीस निरीक्षक पद्मा घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे,सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहा फौजदार शब्बीर पठाण,पो हवा दत्तात्रय तांबे,सचिन गायकवाड, प्रमोद नवले,पो ना गुरु जाधव यांचे पथक नेमण्यात आले,त्यामध्ये हरवलेली व्यक्ती सचिन जाधव यांचे शेवटचे लोकेशन तपासले असता,त्याठिकाणी झटापट झाल्याचे दिसले त्यावरून पोलिसांनी तपास केला असता बाळशीराम थिटे याचे सचिन जाधव यांच्याशी पैशाच्या व्यवहारातून देवाणघेवाण वरून वाद झाले होते,त्या दृष्टीने थिटे याला चौकशी साठी ताब्यात घेतले असता त्याने इतर तीन साथीदार विजय अनिल सूर्यवंशी वय 27,निलेश मारुती माळी वय 20,निलेश दादुभाऊ बर्डे वय 19 या साथीदारांच्या मदतीने जाधव यास ठार मारल्याचे कबुल केले आहे,आणि पुरावा नष्ट करण्यासाठी जाधव यांना त्यांच्याच गाडीतुन कोरठान खंडोबा घाट येथे नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिल्या चे तपासात निष्पन्न झाले आहे,या  आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,महिलेच्या खूना संदर्भात समांतर तपास करीत असताना LCB यांच्या पथकास गोपनीय व तांत्रिक माहिती द्वारे  खबर मिळाली की शिवनाथ मधे याने सदर महिलेशी संपर्क केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार मांजरवाडी येथून शिवनाथ गावबा मधे वय 42  याला गोरेमळा तालुका जुन्नर येथून त्याला ताब्यात घेतले असता त्याने त्याचा साथीदार सुनिल बबन भूतांब्रे वय 30 राहणार मांजरवाडी यांच्या साथीने सदर महिलेचा खून केल्याचे कबुल केले आहे,सदर महिलेला एका हॉटेलच्या मागे बोलवून किरकोळ कारणावरून वाद वाढल्याने तिला दोघांनी मारहाण करून डोक्यात दगड घालून तिला ठार केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.अशा एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांचा तपास करून आरोपींना अटक केली आहे, त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे आणि मंचर पोलिसांचे ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांनी कौतुक केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News