देऊळगाव गाडा, पडवी परीसरात चंदन चोरांचा सुळसुळाट!!


देऊळगाव गाडा, पडवी परीसरात चंदन चोरांचा सुळसुळाट!!

केडगाव, प्रतिनीधी

दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा ,पडवी माळवाडी परीसरात चंदन चोरांचा उच्छाद वाढला असुन त्यासाठी मोठ्या प्रमाणावर चंदनाच्या झाडांची कत्तल केली जात आहे. 
खुप वर्षांपासून या भागात ही चंदन चोरांची टोळी सक्रीय आहे, परंतु अद्याप यावर कारवाई होत नाही.
              चंदनसारखी मौल्यवान झाडे जर अशी रोज तोडण्यात आली तर लवकरच या झाडाची प्रजाती नष्ट होवु शकतो. चंदनाची तस्करी करून पैसे मिळवण्याचा हा शाॅर्टकट मार्ग निसर्गाला हाणी पोहोचविणारा आहे, त्यामुळे या चोरांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी वन्यप्रेमींनी आशा व्यक्त केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News