सायंबाचीवाडीत गरीब व गरजू कुटूंबांना गहू व तांदूळ वाटप


सायंबाचीवाडीत गरीब व गरजू कुटूंबांना गहू व तांदूळ वाटप

बारामती प्रतिनिधी काशिनाथ पिंगळे:

सायंबाचीवाडी येथील जगन्नाथ रामचंद्र कांबळे यांच्या वतीने गरीब व गरजू ५० कुटूंबांना गहू व तांदूळ यांचे धान्य वाटप करण्यात आले.

 कै.उत्तम रामचंद्र कांबळे यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने लॉकडाऊन असल्यामुळे अन्नदानाचा कार्यक्रम घेता येत नसल्याने सामाजिक बांधिलकी जपत माजी ग्रामपंचायत सदस्य मनोहर भापकर यांच्या हस्ते या धान्यदानाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कांबळे यांच्याकडून यावेळी देण्यात आली.

 उत्तम कांबळे हे माळकरी, सांप्रदायिक तसेच धार्मिक वृत्तीचे असल्याने ते नेहमी दानधर्म, अनाथाश्रमास मदत अशा वेगवेगळ्या रुपाने इतरांना मदत करत असत, त्यामुळे यावेळीही धान्य वाटपाचा कार्यक्रम घ्यावा व या लॉकडाऊनच्या काळात हा कार्यक्रम गरजेचा वाटला म्हणून गहू व तांदूळ यांचे वाटप करण्याचे ठरविले.

  या कार्यक्रमाला दत्तू इंगळे, बाळासाहेब जगताप, दत्तू शितोळे, जगन्नाथ कांबळे, लक्ष्‍मण कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News