कर्जत व राशीन या ठिकाणच्या १७ लॅब मधून होणार मोफत कोरोना रॅपिड एंटीजन चाचणी


कर्जत व राशीन या ठिकाणच्या १७ लॅब मधून होणार मोफत कोरोना रॅपिड एंटीजन चाचणी

१७ लॅब चालक करणार प्रशासनाला मदत, प्रशासनाच्या वतीने करणार टेस्ट 

कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची अनोखी शक्कल 

कर्जत प्रतिनिधी - मोतीराम शिंदे - सर्वसामान्य नागरिकांना काही त्रास होत असल्यास ते डॉक्टरांकडे जातात. त्यांना काय होतंय याची माहिती याची माहिती देतात. तसेच नागरिक काहीतरी आजार किंवा लक्षणे असल्यास पॅथॉलॉजि लॅब मध्ये वेगवेगळ्या टेस्ट करण्यासाठी जातात.  या सर्व डॉक्टरांना  पॅथॉलॉजि लॅब चालक यांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास कोरोना सदृश्य लक्षणे असलेले नागरिक तात्काळ मिळून येतील आणि त्यांच्या लवकर टेस्ट करून कोरोना असल्यास तात्काळ उपचार करता येतील हा विचार करून कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत येथील १० आणि राशीन येथील ७ पॅथॉलॉजि लॅब चालकांची कर्जत पोलीस स्टेशन तसेच राशीन पोलीस दुरक्षेत्र येथे पोलीस जवान मनोज लातूरकर, गोवर्धन कदम आणि गणेश भागडे यांच्या मदतीने मीटिंग बोलावली. त्या मीटिंग मध्ये प्रशासनाचे म्हणणे पो. नि. यादव यांनी समजावून सांगितले. आणि जास्तीत जास्त लोकांच्या टेस्ट केल्यास कसा फायदा होईल व नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यासाठी कशी सोय करणे आवश्यक आहे याबाबत चर्चा केली. तसेच प्रशासनाच्या वतीने सर्वांना रॅपिड अँटीजन किट, मास्क आणि हॅन्ड ग्लोवस उपलब्ध करून देण्यात येतील आपण फक्त टेस्ट करा असे आवाहन करुन हे १७ लॅब चालक विनामूल्य कोरोना टेस्ट करण्यासाठी तयार झाले आहेत. याबाबत  डॉक्टर्सनी सुद्धा  पेशंट आला की त्याची लॅब मध्ये  कोरोना टेस्ट करू शकता आणि करावी याबाबत आवाहन केले आहे. 


पोलीस निरीक्षक यांनी सर्व लॅब चालक यांचेशी चर्चा करून RAT टेस्ट करण्यासाठीचे किट आणि मास्क प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार  नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी  अमोल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी  संदीप पुंड यांच्या हस्ते सर्व लॅब चालकांना किट देण्यात आले. या सर्व टेस्टसचा डेटा हा तालुका आरोग्य कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. वेळोवेळी प्रशासनाचे प्रतिनिधी सदर ठिकाणी टेस्टिंग वेळी उपस्थित राहणार आहेत.


 यामुळे कर्जत व राशीन ग्रामस्थांना कोरोना चाचणी करणे सोयीस्कर होणार असून लोकांचा वेळ वाचणार आहे. तसेच गर्दीचे प्रमाण देखील  होणार नाही. सदर टेस्टची सर्व माहिती रोजचे रोज प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांवर उपचार करता येणार आहेत आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग  सुध्दा करता येणार आहे.

           सदर उपक्रमामुळे तालुक्यात जास्तीत जास्त कोरोना टेस्ट होतील व कोरोना संसर्ग हा नियंत्रणात आणण्यास खूप मोठी मदत होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी यापुढे कर्जत येथील १० लॅब चालक व राशीन येथील ७ लॅब मध्ये मोफत रॅपिड एंटीजन चाचणी करून मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन आपली कोरणा टेस्ट करून घ्यावी. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 


कर्जत येथील लॅबचा पत्ता व मोबाईल नंबर खालील प्रमाणे 


1)ओम लॅब

संतोष बालगुडे,

9423465103, 7841986928, 7385465103


2)साई अद्वैत पॅथॉलॉजि लॅब, दादा पाचर्णे, 7507709481


3)निदान लॅब, नंदलाल काळदाते, 9423389476


4)सुरवरे लॅब, परबत सुरवसे, 9423461345,


5)सार्थक क्लिनिकल लॅब, युवराज शिंदे, 9021637555


6)स्वरा लॅब, राहुल शेळके, 8007424148


7)श्री गणेश लॅब, सतीश तनपुरे, 9420637001


8)समर्थ लॅब, मनोज वाघमारे, 9421334051


9)सद्गुरू लॅब, अजय लांडघुले, 9975634663


10)कार्तिक क्लिनिकल लॅब, रामकृष्ण तापकीर, 9561109451


राशीन येथील लॅब साठी संपर्क

 

1) श्री साई पॅथॉलॉजीकल लॅब

नवनाथ काळे

9423754232


2)युनिक लॅब 

कविता अंकुश काळे 

9404946486


3)ऋतुजा लॅब

 संतोष फरांडे 

9960960182, 7741893395


4)सिद्धिविनायक लॅब

शीतल सतीश काळे 

9503133293


5)श्री जगदंबा लॅब 

बाळासाहेब चव्हाण 

9970828312, 76207152739


6)श्री लॅब

अतुल कानगुडे 

9665819877


7)हायटेक लॅब 

सय्यद व्ही 

9657122420

जाहिरात
Search
विडिओ
Recent News