देवळाली प्रवरा येथे लहान मुलांच्या दृष्टीनेन १०० खाटांचे कोविड सेंटर


देवळाली प्रवरा येथे  लहान मुलांच्या दृष्टीनेन १०० खाटांचे कोविड सेंटर

देवळाली प्रवरा, महाराष्ट्रभुमी प्रतिनिधी

                    कोरोना महामारीची तिसरी लाट येऊ घातली आहे व विशेषकरून त्या लाटेचा प्रभाव लहान मुलांवर होण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञांचं मत आहे त्या दृष्टीनेन १०० खाटांचे कोविड सेंटर उभारण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कडून हिरवा कंदिल मिळाला असुन लवकरच हे कोविड सेंटर उभे राहणार आहे. असे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले.

              देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहातून ऑनलाईन  व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे प्रभाग निहाय दक्षता समितीची आढावा बैठक घेण्यात आली व यामध्ये प्रत्येक प्रभागातील आजवर  रॅपिड अँटीजन चाचणी घेण्या आल्या आहेत त्यातील बाधित आढळून आलेले रुग्ण संख्या त्यांच्या कुटूंबातील व संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करून घेतल्या आहेत का? बाधित सापडलेल्या रुग्णांना कॉरंटाईन सेंटर येथे किंवा रुग्णालयात दाखल केले आहे का? कॉन्टॅक्ट ट्रेसिंग योग्यरित्या होते का? याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली..... या बैठकी नंतर नगराध्यक्ष कदम यांनी बोलताना सांगितले. या बैठकीस मुख्याधिकारी अजित निकत, कार्यालयीन अधिक्षक बन्सी वाळके, एम.एस पापडीवाल आदी उपस्थित होते. तर आँनलाईन बैठकीत प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक या दक्षता समिती मध्ये अध्यक्ष व सहअध्यक्ष आहेत यामध्ये दोन कर्मचारी, एक शिक्षक असे नऊ प्रभागाचे दक्षता समिती बैठकीस ऑनलाईन सहभागी झाले होते.

               कोरोना महामारीची तिसरी लाट येऊ घातल्याने १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्या बाबत सविस्तर चर्चा झाली आहे. प्रभाग निहाय रॅपिड टेस्ट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नगरपरिषदेचे फिरते कोरोना रॅपिड अँटीजन चाचणी पथक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील रॅपिड व आर.टी.पी.सी.आर टेस्ट साठी नागरिकांना प्रोत्साहन देणे, नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्क आदी नियमांचे पालन करण्यासाठी नगरसेवक व दक्षता समितीने पुढाकार घ्यावा. माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाचा आढावा घेण्यात आला. तिसऱ्या लाटेच्या अनुसंगाने देवळाली प्रवरा शहरात विना मोबदला १०० खाटांचे ऑक्सीजनयुक्त कोविड सेंटर सुरु करण्या बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलेला प्रस्तावाबाबत विचार विनिमय करण्यात आला, १०० खाटांच्या कोविड सेंटर साठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून मनुष्यबळ उपलब्ध करुन घेणे.

              हिवरे बाजारच्या धरतीवर प्रभाग निहाय विलगिकरणाची व्यवस्था निर्माण करणे, किराणा दुकानात गर्दी टाळण्यासाठी मोबाईलवर यादी पाठवून घरपोहच सुविधा उपलब्ध करण्यासाठी दक्षता समितीने पुढाकार घेवून किराणा व्यावसायिक व नागरिकांना प्रवृत्त करणे आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली, पुढे बोलताना नगराध्यक्ष म्हणाले की नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी साहेब, सर्व अधिकारी, व कर्मचारी कोरोनावर मात करण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट घेत आहेत व रोजच्या तपासणीचा खरा आकडा शासनाच्या पोर्टलवर अपलोड  होत आहे त्यांचे नक्कीच कौतुक केले पाहिजे व आपण केलेल्या रोजच्या कामाचा तपशील कागदावर उतरून तो जिल्हाधिकारी साहेब व तहसीलदार साहेब यांना सादर करावा असे ते यावेळी म्हणाले....

               या ऑनलाईन बैठकीत  सर्व नगरसेवक व प्रभाग निहाय समितीच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला बैठकीत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे कार्यालयीन अधिक्षक बन्सी वाळके यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News