आयुष मंत्र्यांच्या हस्ते रिपॉझिटरी पोर्टल आणि आयुष संजीवनी अप्लिकेशन उद्या होणार सादर


आयुष मंत्र्यांच्या हस्ते रिपॉझिटरी पोर्टल आणि आयुष संजीवनी अप्लिकेशन उद्या होणार सादर

नवी दिल्‍ली, 26 मे 2021

केंद्रिय राज्यमंत्री (अतिरिक्त कार्यभार) किरेन रिजीजू आयुष क्लिनिकल केस रिपॉझिटरी (एसीसीआर) पोर्टल तसेच आयुष संजीवनी अप्लिकेशनची तिसरी आवृत्ती आभासी कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्या सादर करतील तेव्हा, आयुष क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार होणार आहे.

आयुष क्लिनिकल रिपॉझिटरी (एसीसीआर) पोर्टल (https://accr.ayush.gov.in/) हे आयुष सेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक व्यासपीठ म्हणून कार्यरत राहणार आहे. आयुष सेवा देणाऱ्या डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणावर प्राप्त केल्या जाणाऱ्या वैद्यकीय परिणामांबद्दल  एकूण माहिती उपलब्ध करून देणे हे या पोर्टलचा उद्दिष्ट आहे. हे केवळ माहितीचा प्रसार करण्यापुरतेच नव्हे तर त्याही पुढे जाऊन विश्लेषण आणि संशोधनासाठी त्याचा वापर केला जाणे अपेक्षित आहे. विविध आजारांच्या परिस्थितीवरील उपचारपद्धतींबाबत आयुष कार्यपद्धीच्या क्षमतांची, सामर्थ्याची नोंद करणे, त्याचे दस्तऐवज होणे अपेक्षित आहे.

केवळ सेवा देणाऱ्या वैद्यकीय गटापुरतेच हे पोर्टल फायदेशीर नाही, तर आयुषच्या सर्व पद्धतींचा ठोस वैज्ञानिक पाया विस्तारण्यास देखील मदत करेल. एसीसीआर पोर्टलची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे यात आयुष पद्धतीच्या माध्यमातून बरे झालेल्या कोविड-19च्या रुग्णांबाबत त्यांचा तपशील प्रसिद्ध करण्याबाबत समर्पित विभाग असेल.

आयुष संजीवनी अप्लिकेशन (तिसरी आवृत्ती) ही आता गूगल प्ले स्टोअरवर आणि आयओएस वर प्रसिद्ध झाली आहे. लक्षणे नसलेल्या आणि सूक्ष्म लक्षणे असलेल्या कोविड 19 च्या रुग्णांच्या व्यवस्थापनात वापरले जाणारे आयुष 64 आणि कबासुरा कुडिनीर औषधांबरोबर निवडक आयुष उचारप्रणालीचा अभ्यास / दस्त यांची लक्षणीय सुविधा ही आवृत्ती देणार आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की एक राष्ट्रीय वितरण मोहीम सुरू आहे, ज्याद्वारे आयुष मंत्रालय हे प्रभावी आयुष फॉर्म्युलेशन घरी विलगीकरणात असलेल्या कोविड रुग्णांसाठी मोफत प्रदान करीत आहे.

पोर्टल सादरीकरणाच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दुपारी 3.30 वाजल्यापासून आयुष मंत्रालयाच्या फेसबुक आणि यू ट्यूब या समाज माध्यमांवर पाहता येईल. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News