मुलाच्या मृत्यूच्या धक्याने आईचे निधन,गोपाळवाडी गावावर शोककळा


मुलाच्या मृत्यूच्या धक्याने आईचे निधन,गोपाळवाडी गावावर शोककळा

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी 

 कोरोना या महामारी ने हाहाकार माजविला आहे,या रोगामुळे कितीतरी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे,तशीच परिस्थिती गोपाळवाडी गावात घडली आहे,कोरोनाने मोठ्या मुलाचा मृत्यू झाल्याने आईला तो धक्का सहन न झाल्याने आईचेही पहाटे निधन झाले,त्यामुळे त्यांच्या परिवारासह,नातेवाईक,आप्तेष्ट,मित्र परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे,गोपाळवाडी गावचे माजी सरपंच मनमिळावू व्यक्तिमत्व नानाभाऊ पवार हे गेल्या एक महिन्यापासून खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते,त्यांना रेमडीसिवर काळ्या बाजारात विकत घ्यावी लागली,त्यांचे भाऊ, मुलगा, पुतणे,त्यांचे मित्र यांनी मुंबई हून दीड लाखाला एक इंजेक्शन आणून त्यांना वाचविण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले,नानाभाऊ त्यांचे बंधू आई हे सर्वजण वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार घेत होते, परंतू नानाभाऊ यांची तब्येत कधी कमी जास्त होत होती, परंतू घरच्यांनी हार मानली नाही, त्यांचे  प्रयत्न सुरूच होते,  परंतू नियती पुढे कोणाचे काही चालत नाही अखेर नानाभाऊ यांची 25 मे रोजी प्राणज्योत मालवली,त्यांच्या आकस्मित जाण्याने राजकारणातील एक सच्चा कार्यकर्ता गेल्याच्या भावना लोकांनी व्यक्त केल्या,सामाजिक कार्यात सहभागी होणारे नानाभाऊ ग्रामपंचायत सरपंच म्हणूनही त्यांचे कार्य उल्लेखनीय होते,विरोधकांशी सुद्धा हसून बोलणाऱ्या नानाभाऊ यांच्या जाण्याने नातेवाइकांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती,हाच धक्का  त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई बबन पवार यांना सहन झाला नाही दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे निधन झाले,या घटनेमुळे परिसरात,पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे,माय लेकरांच्या अशा अचानक जाण्याने त्यांची मुले मुली,नातवंडे यांनी हंबरडा फोडला,त्यामुळे सर्वानाच गहिवरून आले,मातोश्री लक्ष्मीबाई पवार यांच्या मागे दोन मुले तीन सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे,त्यांना या अतिशय दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.आमची महाराष्ट्र भुमी मराठी न्यूज चॅनल ची संपूर्ण टीम त्यांच्या दुःखद सहभागी आहोत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News