विद्यार्थ्यांनी केले अँटीजन किटचे वाटप!


विद्यार्थ्यांनी केले अँटीजन किटचे वाटप!

वरवंड प्रतिनिधी, विजय मोरे:

वरवंड-दौड तालुक्यातील वरवंड येथील गोपीनाथ विद्यालयातील इयत्ता १०वी च्या २०१०-११;या सालातील बॅचच्या सुमारे ७०विद्यार्थ्यांच्या गृपच्या वतीने येथील कोविड सेंटरला सुमारे वीस हजार रुपयांचे २०० अँटीजन किटचे वाटप करण्यात आले.यासाठी व्हॉट्स अप गृप च्या मदतीचे आवाहन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी केलेल्या या मदतीमुळे वरवंडचे उपसरपंच प्रदिप दिवेकर यांनी कौतुक केले आहे.

    वरवंड येथे असलेल्या कोविड सेंटर सेंटर मध्ये वरवंड परिसरातील कडेठाण,हातवळण,तसेच माळवाडी अशा ठिकाणचे कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे कोरोना रुग्ण तपासणी करण्यासाठी अँटीजन किटची कमतरता भासत होती.विद्यार्थ्यांनी हिच गरज ओळखून किट वाटप; करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.विद्यार्थीही आता कोविड रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आल्यामुळे येथील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

    येथील कोविड सेंटर मध्ये आलेले रुग्ण बरे होऊन जात आहेत.यासाठी येथील सर्व आरोग्य कर्मचारी व समन्वयक सुभाष फासगे यांचे मोठे योगदान लाभत आहे.मात्र बरे झालेेेले रुग्ण कोविड सेेंटर हे आपले घर आहे.या भावनेेतून मदत करत आहेत.यावेळी विशाल सरनोत,कुशल पटेल,शाम सागडे,अक्षय जगताप,पितेश चव्हान,अक्षय पटेल,आकाश पवार,महेश कदम,रजीत इथापे,अभिजीत कुतवळ,भाउसाहेब टेगले,अभिजीत लगड हे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.     

                           वरवंड येथील कोविड सेंटर मधून बरे झालेल्या रुग्णांना;घरी जाताना त्यांना एक झाड भेट दिले जात आहे.या उद्देशाने कोविड सेंटरने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी  नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.यामुळे भविष्यात ऑक्सिजन वाढण्यास मदत होईल.यासाठी वड, पिंपळ, जांभूळ,व लिंब अशी १०० मोठी देशी झाडांचे वाटप वरवंड येथील सामाजिक कार्यकर्ते व सुमन नारायण कन्स्ट्रक्शनचे  मालक संजय जाधव यांच्या वतीने देण्यात आली आहेत.यानिमित्ताने पर्यावरण वाढीची एक नवी चळवळ उभी राहत आहे.याबाबत पर्यावरण प्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News