मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आणि अभिनेता सुदीप पांडे यांच्या आई चंदा पांडे यांचे कोरोनाने निधन


मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आणि अभिनेता सुदीप पांडे यांच्या आई चंदा पांडे यांचे कोरोनाने निधन

मुंबई / नवी मुंबई : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने असंख्य लोकांचे जीव घेतले आहेतअनेक सेलिब्रेटीजही या रोगाने संक्रमित झाले असून अनेकांनी आपले जीवाभावाचे कुटुंबीय गमावले आहेतमुंबई एनसीपीमहाराष्ट्रचे सरचिटणीस आणि भोजपुरी अभिनेता सुदीप पांडे यांची आई चंदा पांडे यांचे नुकतेच वयाच्या 76व्या वर्षी 21 मे 2021 रोजी नवी मुंबईतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये निधन झालेतत्पूर्वी गेल्याच महिन्यात त्यांचे वडील उपेंद्रनाथ पांडे यांचेही वयाच्या 80व्या वर्षी 14 एप्रिल 2021 रोजी नवी मुंबईतच निधन झाले होतेदोघांनाही मृत्यूच्या काही दिवस आधी नवी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होतेत्यांच्यावर नवी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आलेसुदीप पांडे यांची बहीण निशी चौबेतिचे पती बिनोद चौबेकाही मित्र आणि कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी सुदीप पांडे यांच्या निवासस्थानी पोहोचले होतेबाकी सर्वजण व्हिडीयो कॉन्फ्रन्सद्वारे यावेळी उपस्थित राहिले.

              सुदीप पांडे यांनी सांगितले की, "माझ्या आई वडिलांचे प्रेम माझ्यासाठी अनमोल आहेते आता आपल्यात नाहीतपण त्यांना विसरता येणे केवळ अशक्य आहेते कोठेही असले तरी माझ्या मनात सदैव राहतीलइतक्या कमी वयातच 

आई वडिलांना गमावणे खूपच दु:खदायक असतेआपण भाग्य बदलू शकत नाहीपण किमान एका गोष्टीचे मला समाधान आहे की एमजीएम हॉस्पिटलने माझ्या आईला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केलेयासाठी आमचे सगळे कुटुंबीय एमजीएम हॉस्पिटलचे डीन श्रीजीएसनरशेट्टी आणि त्यांच्या मेडिकल टीमचे आभारी आहोत."

                 याप्रसंगी सुदीप पांडे आणि बिनोद चौबे यांनी गोरगरीबांना जेवणाचे वाटप केलेयाबाबत विचारले तेव्हा ते म्हणाले, "माझ्या आई वडिलांना गरजवंतांना मदत करायला नेहमी आवडायचेम्हणून आम्हा कुटुंबीयांचीही ती संस्कृतीच बनली आहे." सुदीप पांडे यांच्या आई वडिलांच्या निधनावर संपूर्ण भोजपुरी चित्रपट उद्योग आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्यांनी शोक व्यक्त केला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News