बुद्ध जयंती निमित्त कोरोना रोगावर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ३० गोळ्यांचे ( किट)वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाटप


बुद्ध जयंती निमित्त कोरोना रोगावर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ३० गोळ्यांचे ( किट)वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाटप

शिर्डी,राजेंद्र दूनबळे, दि.२६ मे रोजी वैशाख पौर्णिमा निमित्ताने कोपरगाव येथील लुम्बिनी उपोवन बुद्धविहार (मोठा पूल) याठिकाणी बुद्ध जयंती निमित्त कोरोना रोगावर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथीच्या आर्सनिक अल्बम ३० गोळ्यांचे ( किट)वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भन्तेजी काशप व सर्व उपस्तितांना वाटप करण्यात आले.

 महाराष्ट्रत कोरोनाचा कहर सुरू झाला.त्या पहिल्या लाटेत प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथीच्या आर्सनिक अल्बम 30 हे औषध  उपयुक्त ठरले होते. म्हणून त्याचे विशिष्ट मात्राचे सेवन लोकांनी केले .व आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास लोकांना मदत झाली. त्या वेळीं ते मिळविण्यासाठी आणि त्याच्या घरोघर वाटपासाठी झालेली धावपळ लोकांच्या स्मररणात असेल ,

 दुसऱ्या लाटे दरम्यान लोकांना त्याचा पूर्णपणे विसर पडलेला दिसतो. साथ सुरू होऊन वर्ष उलटून गेली. तसेच करोनाच्या  दुसऱ्या  लाटेने  मृत्यूचे तांडव संपूर्ण देशभर उभे केले. कारण दुसऱ्या लाटेत लोकांनी आर्सनिक अल्बम 30 हे घेतले नाही. किंवा प्रशासनाने त्याची वाटप केली नाही. त्यामुळे रुग्णचे प्रमाण जास्त झाले .त्याची उपयुक्तता लक्षत घेऊन अपेक्षित येणाऱ्या 3 ऱ्या लाटे आधी लहान मुलांच्या आरोग्यास फायदेशिर ठरू शकते.यावर शासनाने विचार करावा. कारण ह्या गोळ्या लहान मुलांना देणे सहज शक्य आहे .व तिसरी लाट आपल्याला सहज थोपवता येईल,

      असे वंचित बहुजन आघाडी चे मा.जि अध्यक्ष व जि. सल्लागार श्री शरद खरात यांनी आपले मनोगत वेक्त केले.या कार्यक्रमच्या वेळी जि कार्यध्यक्ष अनिल बनसोडे , शहर उपध्यक्ष संजय कोपरे आकाश दुशिग ,निलेश खरात, शैलेश खरात, सिद्देश खरात, दिपक शिनगारे, आदि वंचित चे कार्यकर्ते उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News