निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी,दौंड येथे मतदान केंद्र प्रमुखावर गुन्हा दाखल


निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी,दौंड येथे मतदान केंद्र प्रमुखावर गुन्हा दाखल

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड तालुक्यातील सोनवडी ग्रामपंचायतच्या निवडणूकीत मतदान केंद्र प्रमुख नानासाहेब शिंदे यांनी शासकीय कामात हलगर्जीपणा करत बोगस मतदान केल्याप्रकरणी गट शिक्षण अधिकारी नवनाथ वणवे यांच्या फिर्यादीवरून सोमवार (ता.२४) रोजी प्राध्यापक नानासाहेब शिंदे यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील एकूण ४९ ग्रामपंचायत निवडणूक १५ जानेवारी 21  रोजी पार पाडली होती. सोनवडी ग्रामपंचायत मधील प्रभाग क्रमांक २ मध्ये केंद्र प्रमुखाकानेच बोगस मतदान केले असल्याचे समोर आल्याने मतदान केंद्रामध्ये काही वेळ गोंधळ उडाला होता, जेष्ठ किंवा अपंग व्यक्तींना मतदान करण्यासाठी अडचण असेल तर कुटुंबातील सदस्य यांना मदतीसाठी जाऊ दिले जाते, मात्र केंद्र प्रमुखाने जेष्ठ महिलेसोबत कुटुंबातील सदस्यला सोबत जाण्यास सहमती न देता स्वतः जाऊन मतदाराचे मत केले. जेष्ठ महिलेला दिसत नसताना त्यांच्या नातेवाईकांना बाहेर थांबवुन स्वतः मतदान करण्यासाठी गेल्याने जेष्ठ महिलेच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी मतदान केंद्र प्रमुखावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे काही वेळ केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती, 

    दरम्यान, बोगस मतदान केल्याप्रकरणी संबंधित महिलेनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. सादर अहवालानुसार निवडणूक विषयक महत्त्वाच्या कामकाजात व शासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. दौंड तहसीलदारांनी दोषी प्राध्यापक शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

    सोनवडी ग्रामपंचायतच्या निवडणूकीतील तत्कालीन मतदान केंद्र प्रमुख व दौंड तालुका कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक नानासाहेब शिंदे यांच्यावर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५०, १९५१, १९८९ नुसार १३६(२), लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ व १९८८ नुसार १३४, १३६, ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार २५ दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक लोंढे करीत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News