मोहरवाडी तलावात पिण्यासाठी पाणी सोडण्याकरिता ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा


मोहरवाडी तलावात पिण्यासाठी पाणी सोडण्याकरिता ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा  अंकुश तुपे प्रतिनिधी : 

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील मोहरवाडी तलाव कोरडा पडला असून तळ्यातून कोळगाव गावाला होणारा पाणी पुरवठा बंद झाला असून नुकतेच कुकडीला पाणी आल्याने कोळगाव तळ्यात गावाला पाणी सोडावे अन्यथा गुरूवार दि .२७ रोजी सकाळी ९ वाजता मोहरवाडी गेट येथे पाणी सोडणेसाठी आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांना दिला.

          कोळगाव हे १२ हजार लोकसंख्येचे गाव असून गावच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना मोहरवाडी तलाव येथून चालू आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून मोहरवाडी तलाव कोरडा पडल्याने गावातील पाणी पुरवठा बंद झाला असल्याने गावातील नागरिकांची पाण्यासाठी  हाल सुरू झाले असून नागरीकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली असून नुकतेच कुकडी केनोलला पाणी आल्याने कोळगाव येथील मोहोरवाडी तलावात पिण्याकरिता पाणी सोडावे अशी मागणी करण्यात आली मात्र कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी टेल टू हेड पाणी सोडणेचा निर्णय झाला असून त्यानुसारच पाणी देणार असल्याचे सांगत पिण्याकरिता पाणी देण्यास नकार नागरिकांनी संतप्त होत येत्या २ दिवसात मोहोरवाडी तलावात पिण्याकरिता पाणी सोडावे अन्यथा गुरूवार दि .२७ रोजी सकाळी ९ वाजता मोहरवाडी गेट येथे येवून पाणी सोडणेसाठी आंदोलन करणेत येईल असा इशारा निवेदनाद्वारे कोळगाव ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांना दिला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News