श्रीगोंदा तालुक्यातील दैवदैठण येथे पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे कोविड सेंटरला उदयोजक अतुल लोखंडे यांच्याकडे आर्थिक मदतीचा धनादेश देताना उदयोजक महेश देशमुख


श्रीगोंदा तालुक्यातील दैवदैठण येथे पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे कोविड सेंटरला उदयोजक अतुल लोखंडे यांच्याकडे आर्थिक मदतीचा धनादेश देताना उदयोजक महेश देशमुख

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील लोकसहभागातून उभारलेल्या कोविड सेंटरमधील आरोग्य सेवेचे चांगले काम पाहून थेट उस्मानाबादहून आर्थिक मदत मिळाली आहे. पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे व उद्योजक अतुल लोखंडे यांच्या पुढाकारातून देवदैठण येथे  पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या नावाने कोविड आरोग्य मंदिर उभारण्यात आले आहे. गेल्या तीन आठवडयात देवदैठणसह परीसरातील शेकडो गरीब व सर्वसामान्य रुग्णांनी या ठिकाणी उपचार घेतले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सकस आहार व योग्य उपचार पद्धतीमुळे अनेक रुग्ण बरे होत समाधान व्यक्त करून सुखरुप घरी गेले आहेत. या कोविड सेंटरमधील उपचार घेत असलेल्या व बरे होऊन जात असलेल्या रुग्णांच्या सकारात्मक प्रतिक्रियांचा सोशल मिडीयावर झालेला प्रचार व प्रसार तसेच विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या बातम्या वाचून हिंगणी दु॥ ( ता. श्रीगोंदा ) येथील आपले सहकारी निवेदक रावसाहेब चक्रे यांच्या सहाय्याने उस्मानाबाद जिल्हयातील पेठ सांगवी ( ता. उमरगा ) येथील उदयोजक महेश देशमुख यांनी देवदैठण येथील पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिराला प्रत्यक्ष भेट दिली. स्वयंसेवकांकडून सर्व माहिती घेतली आणि शेवटी मदत करताना उदयोजक अतुल लोखंडे यांच्याकडे २५ हजार रूपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी उदयोजक जयेश कंद, महेंद्र कंद, पत्रकार दीपक वाघमारे, संदिप घावटे, संदिप बोरगे आदी उपस्थित होते.

 मोठया दवाखान्यातील उपचाराचा खर्च परवडत नसल्याने गरीब व सर्वसामान्य कुटूंबातीलच रुग्ण कोविड सेंटरमधे उपचार घेत असतात. त्यामुळे त्यांच्या उपचारासाठी काहि ना काहि मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. या कोविड सेंटरमधील आरोग्य सेवा, डॉक्टर व विशेषतः स्वयंसेवकांचे काम चांगले असल्याने जनसेवा हिच ईश्वर सेवा मानून आपण सामाजिक बांधिलकी जोपासताना रुग्णांच्या खर्चासाठी आर्थिक मदतीचा हातभार लावला आहे. महेश देशमुख ( उदयोजक )

जाहिरात
Search
विडिओ
Recent News