चोर आहेत की जादूगर,सजीव वस्तूपासून निर्जीववस्तू पर्यंत काहीपण चोरले,LCB पथकाने मुद्देमालासह धरले


चोर आहेत की जादूगर,सजीव वस्तूपासून निर्जीववस्तू पर्यंत काहीपण चोरले,LCB पथकाने मुद्देमालासह धरले

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारी, पोलिसांनी कलंदर चोर पकडले आहेत,चार ठिकाणचे राहणारे चार कलंदर एकत्र येऊन त्यांनी वेगळ्याच घटनेला वळण दिले,कोरो ना पेशंट साठी लागणारे ओक्सीजन सिलेंडर,घरगुती गॅस सिलिंडर या निर्जीव वस्तू पासून गायी चोरी करण्यापर्यंत काहीपण चोरले,अशा कलंदर चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  77 लाखांच्या मुद्देमालासह चौघांना पकडले आहे,पुणे,सोलापूर,अहमदनगर या तीन जिल्ह्यात 21 ठिकाणी  शेतकऱ्यांचे 10 ट्रॅक्टर, 2 पिकअप, 1 बोलेरो, स्कॉर्पिओ, 6 मोटर सायकल, 5 गाई असा 77 लाखांचा ऐवज चोरी केल्याची धक्कादायक बाब पुणे ग्रामिण च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणली असून या 4 आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार शिरूर तालुका, पारनेर तालुका, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरीचे बरेच गुन्हे घडत होते त्याअनुशंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री.डॉ.अभिनव देशमुख, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. मिलींद मोहीते, बारामती विभाग यांनी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट यांना शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सक्त सुचना दिल्या होत्या.या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, फौजदार दत्तात्रय गिरमकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, सचिन गायकवाड, दत्तात्रय तांबे, पो.ना.दिपक साबळे, राजू मोमीण, अजित भुजबळ, गुरू जाधव, मंगेश थिगळे, पो.कॉ. संदिप वारे, जितेंद्र मांडगे, अक्षय जावळे यांचे पथक तयार करून तपासकामी रवाना केले होते.

स्थानिक गुन्हे शाखा पथकास शिरूर शहरात राहणारे इसम सतीश अशोक राक्षे, ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे व प्रविण कैलास कोरडे हे तिघेही एकत्रात फिरतात ते कोणताही कामधंदा करीत नसून त्यांचेकडे वेगवेगळया ट्रॅक्टर, पिकअप, टू व्हीलर अशा गाडया कोठून तरी घेऊन येतात त्या चोरीच्या असाव्यात अशी गोपनीय माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने इसम सतीश अशोक राक्षे, (रा. बेलवंडीफाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर, सध्या रा. राजमाता बिल्डींग, बाबुरावनगर, शिरूर,ता. शिरूर, जि.पुणे) यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेतले असता त्याने त्याचे साथिदार 

ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे, (रा.रम्यनगरी कॉलनी, धनु झेंडे यांचे बिल्डींगमध्ये, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ रा. जयनगर, ता. औसा, जि. लातूर) प्रविण कैलास

कोरडे, (मुळ रा. बोरी, ता. जुन्नर, जि. पुणे, सध्या रा. राजमाता बिल्डींग, बाबुरावनगर, शिरूर,ता. शिरूर, जि.पुणे) व सुनिल उर्फ भाऊ बिभीषण देवकाते (रा. इरले, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांचेसह मिळून २८ ठिकाणी चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली.त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एकुण ७६ लाख ८८ हजार किंमतीचे १० ट्रॅक्टर, २ पिकअप, १ बोलेरो जिप, १ स्कॉपीओ, ६ मोटार सायकल, ऑक्सीजन सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर, गॅस कटर, नटबोल्ट खोलावयाचे पान्हे,5 गायी असा मोठा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.तसेच बँक, पतसंस्था, ए टी एम फोडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी 21पोलीस ठिकाणी गुन्हे दाखल आहेत,  सदर आरोपींनी पुणे, अहमदनगर, सोलापूर अशा ३ जिल्ह्यांमध्ये 28 ठिकाणी चोऱ्या करून वरील मुद्देमाल चोरी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News