पर्यावरण संवर्धनासाठी संतांच्या नावाने झाडे लावण्याची मोहिम, पीपल्स हेल्पलाईन,


पर्यावरण संवर्धनासाठी संतांच्या नावाने झाडे लावण्याची मोहिम, पीपल्स हेल्पलाईन,

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- पर्यावरण संवर्धनासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने पांडूरंग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत घराच्या अंगणात संतांच्या नावाने झाडे लावण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे. तर राज्य सरकारकडे नॅनो नर्सरी व नॅनो गार्डनसाठी प्रोत्साहन देण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

मागील वर्षी कोरोनामुळे पंढरपूरची वारी होऊ शकली नाही. मात्र संघटनेच्या पुढाकाराने पांडूरंग आपल्या दारी हे उपक्रम सुरु करुन मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली. यावर्षी देखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पंढरपूरची वारी होण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये या अभियानातंर्गत मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात खाजगी जागा पडून आहे. अनेकांनी जागेत पैसे गुंतवले असून, या पडिक जागेवर नॅनो नर्सरी व नॅनो गार्डन उभे राहू शकतात. कोरोना काळात अनेक रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला. मात्र ऑक्सिजन देणार्‍या झाडांची कमतरता भरुन काढण्यासाठी नागरिकांनी वृक्षरोपण व संवर्धन या मोहिमेला गती देण्याची गरज आहे. नॅनो नर्सरी व नॅनो गार्डनच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड होणार आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाचा प्रश्‍न देखील सुटणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.  नॅनो नर्सरी व नॅनो गार्डनच्या माध्यमातून अनेक युवकांचा रोजगाराचा प्रश्‍न सुटणार असून, नागरिकांना देखील उत्तम दर्जाचे फळ झाडे उपलब्ध होणार आहे. प्रत्येक कुटुंबीयांनी घरा भोवती संतांच्या नावाने झाडे लावल्यास पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या उपक्रमासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, वीरबहादूर प्रजापती, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा आदी प्रयत्नशील आहेत.  


 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News