भाजपच्या पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यां कडुन सोशियल मिडीयावर बदनामी - सचिन पोटरे


भाजपच्या पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यां कडुन सोशियल मिडीयावर बदनामी - सचिन पोटरे

कर्जत प्रतिनिधी मोतीराम शिंदे :

सोशल मीडियावर वैयक्तिक बदनामी करून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धमकी देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष  डॉक्टर सुनील गावडे व भाजपाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांच्या वतीने कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे तसेच कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदने देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की कर्जत तालुक्यासाठी सुटणाऱ्या कुकडीच्या आवर्तनाला  उशीर झाल्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांची उभी पिके आणि फळबागा जळून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच लोकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच भर म्हणून कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी कुकडी सल्लागार समितीवर कर्जत तालुक्यातील पदाधिकाऱ्याची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करणे आवश्यक असताना आमदार रोहित पवार यांनी श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांची कुकडीच्या सल्लागार समितीवर कर्जत तालुक्याच्या वतीने प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली . याबद्दल विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या वतीने या प्रकरणी आवाज उठवण्यात आला होता त्यावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले दीपक यादव व त्यांचे बंधू सुधीर यादव हे सातत्याने सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर एकेरी भाषेत उल्लेख करून चिखलफेक करत आहेत . असा आरोप या निवेदनातून सुनील गावडे यांनी केला आहे. तसेच गावडे यांनी या निवेदनात म्हटले आहे की भाजपाच्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची वैयक्तिक बदनामी सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच जे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या विरोधात सोशियल मिडीयावर कमेंट करतात यांना दमबाजी करून त्यांची सोशल मीडियावर कौटुंबिक व वैयक्तिक बदनामी केली जात असून सोशल मीडिया वरच अनेक भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत तसेच आमदार रोहित पवार यांच्या विरोधात जो काही  बोलेल त्याला आम्ही सोडणार नाही. असे बोलून लोकशाहीची गळचेपी केली जात असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरही असभ्य भाषेत कमेंट केल्या जात असल्याचे या निवेदनातून म्हटले आहे. म्हणून कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर योग्य ती कडक कारवाई करावी अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने या गुंडगिरीच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर सुनील गावडे व भाजपाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांनी या निवेदनातून दिला आहे. या निवेदनावर भाजपाचे जेष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी, माजी जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल कोपनर, कर्जत नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद प्रमुख सचिन पोटरे, तात्यासाहेब माने, धनंजय मोरे, नितीन लोंढे पाटील, सुनील यादव, पप्पू शेठ धोदाड, राहुल निंभोरे, पांडुरंग भंडारे, सुनील काळे, एकनाथ धोंडे, सोयब काझी, गणेश जंजिरे, गोपीनाथ जगताप, अमोल आरडे, सुहास गावडे, महेंद्र धांडे, विठ्ठल अनभुले, आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत यावेळी तहसीलदारांना निवेदन देताना कुकडीच्या पाण्या संदर्भात  जोरदार घोषणा बाजी करण्यात आली यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ सुनिल गावडे, प्रशिद्ध प्रमुख सचिन पोटरे व कीसान आघाडीचे सरचिटणीस सुनिल यादव यांचे भाषणे झाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News