कर्जत पोलिसांच्या पुढाकारातून कर्जत येथील कोव्हिड केअर सेंटर मधे महिला पेशंटच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी


कर्जत पोलिसांच्या पुढाकारातून कर्जत येथील कोव्हिड केअर सेंटर मधे महिला पेशंटच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी

कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतून  महिला कोविड सेंटरला सीसीटीव्ही कॅमेरे राज्यातील पहिले पाऊल 

कर्जत प्रतिनिधी मोतीराम शिंदे:

गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव लोकांना होत असून पुरुष तसेच महिला रुग्ण हे मोठ्या प्रमाणावर कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार घेण्यासाठी दाखल होत असतात. परंतु काही जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये महिला रुग्णांना छेडछाडीचा किंवा इतर त्रास झाल्याची उदाहरणे आहेत. म्हणूनच कर्जत पोलिस हे नेहमीच महिलांच्या सुरक्षेसंदर्भात उपाय योजना करण्यासाठी तत्पर असतात. त्याच धर्तीवर कोविड केअर सेंटर गायकरवाडी, तालुका कर्जत तसेच उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथील कोव्हीड केअर सेंटर अशा दोन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात सुरूवात केली आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे महिला रुग्णांना दिलासा मिळणार आहे, तसेच सुरक्षित वाटणार आहे. आणि याबाबत सरकारच्या सुद्धा  मार्गदर्शक सूचना आहेत. 

कर्जत आणि गायकरवाडी येथे 

सदरचे सी सी टी व्ही कॅमेरे हे श्री शरद मुळे यांचे सिद्धांत एंटरप्रायसेस यांच्या वतीने बसवले जाणार असून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या आवाहनवरून जोपर्यंत कोविड केअर सेंटर सुरू आहे तोपर्यंत हे सीसीटीव्ही कॅमेरे चालू राहणार आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. 

तसेच सदर कोविड परिसरातील नागरिकांना काही अडचणी निर्माण झाल्यास पोलीस स्टेशन चे अधिकारी आणि पोलिस निरीक्षक यांचे मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. जेणेकरून महिलांना काही तक्रार असल्यास तात्काळ त्यांना कर्जत पोलिसांची संपर्क करता येईल. गायकवाडी येथे महिला रुग्ण ऍडमिट असलेल्या इमारतीत ५ कॅमेरे व उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये ७ कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News