दौंड गुन्हे प्रकटीकरण पथकाची दबंग कारवाई, रोड रॉबरी, खंडणी मागणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या


दौंड गुन्हे प्रकटीकरण पथकाची दबंग कारवाई, रोड रॉबरी, खंडणी मागणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

एक महिन्यापूर्वी कुरकुंभ येथील कंपनीची बस अडवून,मॅनेजरला हप्ता देण्यासाठी धमकी देऊन फरार असलेला आरोपी दौंड पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे, दि .२७ / ०४ / २०२१ रोजी रात्री 10 वाजता दौड  गावचे हद्दीत दौड कुरकुंभ रोडला सिप्ला कंपनीची बस कामगार व अधिकरी यांना घेवून जात असताना सहकार चौक येथे त्यांचे बस पाठीमागून दोन इसम मोटर सायकलवर येवून सदर सिप्ला कंपनीची बस अडवून बस मधील अधिकारी कंपनीचे कामगार यास शिवीगाळ दमदाटी करून कंपनीचा मॅनेजर यास फोन करून तुमची बस कंपनीला चालवायची असेल तर तुम्ही मला दर महीना पाच हजार रूपये हप्ता खंडणी दयावी लागेल नाहीतर तुमच्या गाडया चालवू देणार नाही .असे म्हणून बस मधील कामगार खाली उतरवून बस घेवून रस्त्याचे कडेला असलेल्या बॅरीकेटीग ला सदर ची बस धडकून बस  चे नुकसान करून पळून गेले वगैरे मजकूराचे वरून दौंड पोलीस स्टेशम *गु.र. नं .२१८ / २०२१ भा.द.वि .३ ९ २,३८४,५११,३४१,४२७,५०४,५०६.३४*. प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हा घडले पासून आरोपी नामे अभिषेक गोविंद सातपूते रा.शालीमार चौक ता.दौंड जि.पुणे हा फरारी होता, तरी दि .२३ / ०५ / २०२१ रोजी सदर गुन्हयातील फरारी आरोपी हा महालक्ष्मी हॉस्पीटल येथे येणार असल्याची बातमीदारा  मार्फत  बातमी पोलीस अंमलदार अमिर शेख यांना खात्रीशीर मिळाली असता पोलीस निरीक्षक नारायण पवार सो यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे,पो. अंमलदार  अमिर शेख , जब्बार सय्यद , विशाल जावळे , किशोर वाघ , किरण डुके सदर ठिकाणी जावून सदर आरोपी नामे अभिषेक गोविंद सातपूते रा.शालीमार चौक ता.दौंड जि.पुणे हा महालक्ष्मी हॉस्पीटल पासून घरी जाण्याच्या मार्गवर असताना त्यास सापळा रचून शालीमार चौक येथे पकडून ताब्यात घेतले सदर आरोपी कडे सखोल चौकशी केल्यानंतर सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

सदरची कामगीरी ही 

*मा.पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख सो पुणे  ग्रा.

*मा.अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग मिलींद मोहीते* *मा.उपविभागीय पोलीस अधिकारी दौड विभाग दौंड राहूल धस,मा .पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शना खाली*करण्यात आली आहे,पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय वाघमारे करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News