फेरेरो इंडियातर्फ कंपनी मार्फत कोविड-19 हॉस्पिटलसाठी मदत साह्य


फेरेरो इंडियातर्फ कंपनी मार्फत कोविड-19 हॉस्पिटलसाठी मदत साह्य

[ सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटलला व बारामतीमध्ये महिला कोविड सेंटर सरू करण्यात साह्य ]

  सचिन पवार सुपा प्रतिनिधी :

फेरेरो इंडियाने कंपनी तर्फ सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटल व महिला हॉस्पिटल मधील कोविड केअर सेंटर येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी पाठबळ दिले आहे. येथे स्थानिक समुदायासाठी 100 हॉस्पिटल बेड आणि वैद्यकीय उपकरने पुरवण्यात येणार असुन त्यातील १० बेड २० ऑक्सिमिटर दोन दिवसापुर्वी पुरवण्यात आले, तसेच इतर ९० बेड एक आठवड्यात उपलब्ध  करून देण्यात येतील अशी ग्वाही कंपनीच्या वतीने देण्यात आली. 

या कार्यक्रम आयोजन प्रसंगी महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार सह स्थानिक मान्यवर आणि फेरेरोचा कर्मचारी वृंद उपस्थित होते. या साहित्या वितरणाने बारामती शहर आणि आसपासच्या गावामधील रूग्णांना हॉस्पिटल बेड उपलब्ध होऊन रूग्णसेवेला साह्य आहे. 

   या उक्रमाबद्दल फेरेरो इंडियाचे प्रवक्ते म्हणाले, " स्थानिक समुदायाला सेवा देत असताना आरोग्य क्षेत्रातील सामाजिक आणी मानवतावादी उपक्रमांना पाठबळ देण्यास फेरेरो इंडिया बांधिल आहे. आपन समाजाचे काही देणे लागतो व त्यांचे ऋण फेडण्याच्या फेरेरो इंडियाच्या बांधिलकीचा भाग म्हणुन या कोरोना सारख्या महाभयंकर संकटाशी लढा देताना स्थानिक प्रशासनाला आवश्यक साह्य करण्यासाठी त्यांच्या सोबत सहकाया करिता आम्हाला आनंद होत आहे अशी भावना व्यक्त केली ,

   तसेच भारतासारख्या देशातील सविधा न पोहचलेल्या भागांमध्ये रोजगार संधी निर्माण करण्यासाठी फेरेरो ग्रूपच्या मायकल फेरो आंत्रप्रेन्युअल प्रोजेक्ट अंतर्गत फेरेरो इंडियाची स्थापना करण्यात आली असुन बारामती मधील कारखान्याच्या आसपासच्या समुदायामध्ये शिक्षण आणि आरोग्य संबंधी प्रकल्प राबविणे हा फेरेरो इंडियाचा उद्देश आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News