एक गाव कोरोना मुक्त उपक्रमात शहर महिला कॉंग्रेसचा सहभाग.....गिरीजा कुदळे


एक गाव कोरोना मुक्त उपक्रमात शहर महिला कॉंग्रेसचा सहभाग.....गिरीजा कुदळे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

पिंपरी (दि. 23 मे 2021) महाराष्ट्रामध्ये कोरोना कोविड -19 च्या दुस-या लाटेने समाजातील सर्वच घटकांवर विपरीत परिणाम झाला. यामध्ये कमीतकमी मनुष्यहानी व्हावी म्हणून सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे काही अंशी कोरोनावर नियंत्रण मिळवता आले आहे. परंतू याबाबत असणा-या उपाययोजना म्हणजेच तपासणी, उपचार, विलगीकरण, मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे याचा प्रचार घरोघरी व्हावा. यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या वतीने चला करुया एक गाव कोरोना मुक्त हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या सर्व महिला सहभागी होणार आहेत, अशी माहिती महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी दिली आहे.

         माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या 30 व्या स्मृतीदिनानिमित्त शुक्रवारी (दि. 21 मे) महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी प्रदेश महिला कमिटीची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत स्व. राजीव गांधी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी चला करु या एक गाव कोरोना मुक्त या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. तसेच आमदार प्रतिभाताई धनोरकर यांच्या मतदार संघातून या उपक्रमाचे उद्‌घाटनही करण्यात आले. या बैठकीत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव, राजस्थानच्या राज्यमंत्री ममता भुपेश, महिला बाल कल्याण राज्यमंत्री यशोमती ठाकूर, आमदार प्रणिती शिंदे, पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे आदींसह राज्यातील सर्व जिल्हा कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षांनी सहभाग घेतला होता.

         या बैठकीत घोषणा करण्यात आली की, या उपक्रमात सहभागी होणा-या पदाधिका-यांनी आपल्या परिसरातील एक गाव, एक वस्ती, एक वॉर्ड, एक प्रभाग निवडायचा त्या परिसरात सर्व महिला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन परिसरातील सर्व नागरीकांची ॲन्टीजेन टेस्ट महिला कॉंग्रेसच्या वतीने करुन घ्यायची आणि हा परिसर कोरोना मुक्त होण्यासाठी काम करायचे. या उपक्रमात स्थानिक नागरीकांनाही मदतीला घेऊन परिसर, गाव, वॉर्ड, प्रभाग कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. या बैठकीचे संगिता धोंडे, सुदर्शना कौशिक, संगिता तिवारी यांनी नियोजन केले होते अशीही माहिती गिरीजा कुदळे यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News