आयुष मंत्रालयाकडून "योगाभ्यास करा , घरी रहा" या विषयावर पाच वेबिनारच्या मालिकेचे आयोजन मालिकेसाठी पाच नामांकित संस्था एकत्र येणार


आयुष मंत्रालयाकडून "योगाभ्यास करा , घरी रहा" या विषयावर पाच वेबिनारच्या मालिकेचे आयोजन  मालिकेसाठी पाच नामांकित संस्था एकत्र येणार

आंतरराष्ट्रीय योग दिन,  2021 च्या अनुषंगाने  आयुष मंत्रालय विविध उपक्रमांचे आयोजन करत आहे. त्यापैकी एक म्हणजे पाच वेबिनारची मालिका  जी "योगाभ्यास करा , घरी रहा" या संकल्पनेवर आधारित  आहे. देशातील पाच नामांकित संघटनांचे सहकार्य लाभणार असून त्या  सध्याच्या परिस्थितीत एका विशिष्ट विषयावरील  प्रत्येकी एक वेबिनार सादर करतील. आर्ट ऑफ लिव्हिंग द्वारे  सोमवार 24  मे रोजी “बाह्य संकटात आंतरिक शक्तीचा शोध ” यावर पहिले वेबिनार होणार आहे.

पाच वेबिनार मालिकेचा उद्देश कोविड -19 च्या सध्याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या समस्यांविषयी अधिकाधिक लोकांना  आठवण करून देणे हा आहे.  या मालिकेद्वारे या समस्या एकत्रितपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल , या पाच संस्था या समस्यांना उत्तर देतील आणि त्यांचे ज्ञान आणि अनुभव सामायिक करतील

महामारीमुळे लोकांना  मोठ्या संख्येने भेडसावणाऱ्या आव्हानांचा सामोरे जाण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग सोमवारी  संध्याकाळी 5 वाजल्यापासून “बाह्य संकटामध्ये आंतरिक शक्तीचा शोध ” या विषयावर  वेबिनार सादर करेल.  स्वामी पूर्णचैतन्य जी, इंटरनॅशनल फॅकल्टी, आर्ट ऑफ लिव्हिंग आपले विचार मांडतील. आयुष मंत्रालयाचे सहसचिव रणजित कुमार आणि एमडीएनआयवायचे  संचालक डॉ. ईश्वर व्ही. बसवरादी यांचेही भाषण होईल.  आयुष मंत्रालयाच्या युट्यूब आणि फेसबुक पेजवर सर्व वेबिनारचे  थेट प्रक्षेपण केले जाईल.

या मालिकेतले अन्य चार वेबिनर द योग इन्स्टिट्यूट, कृष्णाचार्य योग मंदिरम, अरहमध्यानयोग आणि कैवल्यधाम योग संस्था सादर करतील

जाहिरात
Search
विडिओ
Recent News