दौंड शहरात चार दुकानांवर कारवाई,नियम मोडणाऱ्यावर कडक कारवाई करणार -- पो. नि. नारायण पवार


दौंड शहरात चार दुकानांवर कारवाई,नियम मोडणाऱ्यावर कडक कारवाई करणार --  पो. नि. नारायण पवार

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची  कारवाई,  दौंड शहरात दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण वाढत असताना कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना वारंवार सूचना देऊन ही सूचनांचे पालन करताना काही दुकानदार दिसत नाही याची दखल दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी गांभीर्याने घेऊन ते दुकानदार नियमांचे उल्लंघन करतील त्यांचे दुकान लॉक डाऊन संपेपर्यंत सील करण्याचे प्रस्ताव माननीय तहसीलदार यांना दिनांक 21/5/2021 रोजी पाठवले होते. त्यामध्ये  1)  मकसाने सुपर मार्केट सरपंच वस्ती   2) सपना ड्रेसेस शेजो शाळेशेजारी   3) आहूजा मोबाईल शॉप सराफ दुकानाच्या मागे गांधी चौक   4)  ओम बँगल्स अँड गिफ्ट हाऊस आंबेडकर चौक    यांचा प्रस्ताव माननीय तहसीलदार साहेब यांनी मंजूर केले असून दुकाने पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले  असून त्याची अंमलबजावणी दौंड नगरपालिकेच्या सहकार्याने चालू आहे                                                तसेच अशा प्रकारचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर यापुढेही अशीच कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिला आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News