वाढदिवसानिमित्त कोरोना बाधितांना भोजनाची मेजवानी.. दीपक वाघमारे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी


वाढदिवसानिमित्त कोरोना बाधितांना भोजनाची मेजवानी.. दीपक वाघमारे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी:

               श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील कोविड सेंटर मधील रुग्णांगा पत्रकार दीपक वाघमारे यांनी वाढदिवसानिमित्त सुरुची भोजनाची मेजवानी देत सामाजिक बांधिलकी जोपासली.

               देवदैठण येथे पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे व उद्योजक अतुल लोखंडे यांच्या माध्यमातून दि.१ मे महाराष्ट्र दिनापासून पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदीर सुरु करण्यात आले आहे. आत्तापर्यंत परीसरातील शेकडो रुग्ण या ठिकाणाहून उपचार घेऊन बरे झाले आहेत. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही लॉक डाऊन असल्याने गावोगावच्या यात्रा, जत्रा व हरीनाम सप्ताह आदींसारखे कार्यक्रम पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे त्यावर होणारा खर्च सामाजिक दायित्वातून कोरोना बाधितांवर करुन माणूसकीचे दर्शन घडताना सध्या दिसून येत आहे.

              पत्रकार दीपक वाघमारे यांनी शनिवार दि. २२ मे रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त देवदैठण येथील कोविड आरोग्य मंदिरातील उपचारार्थ रुग्णांना सकस आहाराची मेजवानी देत सामाजिक बांधिलकी  जोपासली. उदयोजक अतुल लोखंडे यांनी सध्या गावोगावच्या यात्रा, जत्रा व हरीनाम सप्ताह आदीं कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे त्यावर होणारा खर्च कोविड रुग्णांसाठी करण्याच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका मीना आढाव, कोरेगव्हाणचे माजी सरपंच संतोष नरोडे, निंबवीच्या माजी उपसरपंच शुभांगी धानगुडे, पिंप्री कोलंदरचे सुखदेव ओहोळ, चिखली ( पुणे ) येथून संतोष वाघमारे, हिंगणीचे नवनाथ शिंदे, महेश कौठाळे यांनीही आपल्या वैयक्तीक तसेच मुला मुलीच्या वा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कोरोना बाधितांना भोजनाची मेजवानी देत माणूसकीचे दर्शन घडविले. तर तळवडे ( पिंप्री चिंचवड ) येथून हॉटेल मल्हार बिर्याणीचे मालक अविनाश भवर यांनी रुग्णांसाठी खास चिकन बिर्याणी पाठवत लवकर बरे व्हा असा संदेश दिला. तसेच राजापूरचे माजी उपसरपंच अशोक ईश्वरे, शिक्षक सखाराम बनकर व शंकर बनकर यांनीही रुग्णांना आमरसासाठी आपल्या शेतातील आंबे देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.

सध्याच्या काळात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जरी माणसात सुरक्षित अंतर राखायचे असले तरी मात्र माणूसकीचे दर्शन घडविताना प्रत्येकाने कर्तव्य म्हणून कोरोना बाधितांसाठी कुठल्याही स्वरुपात मदत करणे गरजेचे आहे. लोकसहभाग आणि आपल्या लाखमोलाच्या मदतीमुळेच कोविड सेंटर चालविणे व रुग्णांना या आजारातून बाहेर काढणे शक्य होईल


कल्याणी लोखंडे ( सदस्या - पंचायत समिती, श्रीगोंदा )

जाहिरात
Search
विडिओ
Recent News