दौंड तालुक्यातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश


दौंड तालुक्यातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड तालुक्यातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ,पुणे सोलापूर रोड,चौफुला या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर यांनी सर्वांचे  पक्षात स्वागत केले. तसेच शिवसेनेत सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाते असे आश्वासन देऊन युवा कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामाला लागा असा सल्ला दिला.

यावेळी  साहेबराव शितोळे, निखिल शितोळे, रितेश शितोळे, अमोल कुर्हाडे, शुभम ढमे यांच्यासह अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेना विभाग प्रमुख हनुमंत निगडे, माऊली आहेर, शंकर शितोळे, प्रशांत शितोळे व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News