कुरकुंभ पांढरेवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा, जुगाऱ्या ना पोलिसांनी दिला चांगला चोप


कुरकुंभ पांढरेवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा, जुगाऱ्या ना पोलिसांनी दिला चांगला चोप

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी ;

दौंड कुरकुंभ गावच्या हद्दीत पांढरेवाडी कुरकुंभ सर्व्हिस रोड लगत एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांना मिळाली होती त्यावरून सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळत असल्याचे दिसून आले,त्यामध्ये राहुल सोपान दोडके वय 34 राहणार कुरकुंभ तालुका दौंड हा काही लोकांना घेऊन बेकायदा बिगर परवाना कल्याण मटका नावाने जुगराची साधने घेऊन लोकांना जुगार खेळवत असल्याचे दिसून आला,कोरोना महामारी सुरू असताना कडक लॉक डाऊन काळात हे सर्व जण कायद्याचे उल्लंघन करून एकत्र बसले असल्यामुळे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या जुगारी तरुणांना चांगलाच चोप दिला आहे,यावेळी नारायण पवार यांनी सांगितले की इतर कोणतेही अवैध वाळू उपसा,गुटखा विक्री,दारू विक्री किंवा जुगार खेळणाऱ्याची गय केली जाणार नाही,सदर घटनेत पो कॉन्स्टेबल दत्तात्रय चांदणे यांच्या सरकारी फिर्यादीवरून 

गुन्हा रजि 267/21 मु जू अँ क 12(अ)आय पी सी 269,270,188, व साथीचा रोग अधिनियम 1897कलम 3नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,अशी माहिती पो हवा श्रीरंग शिंदे यांनी दिली आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा श्रीरंग शिंदे,दत्तात्रय चांदणे,राऊत,राकेश फाळके यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News