डोंगरे संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर वाचनालय आयोजित ऑनलाईन निबंध स्पर्धेत उत्कर्ष शेटीया व तेजस कांदळकर प्रथम...छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा उपक्रम


डोंगरे संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर वाचनालय आयोजित ऑनलाईन निबंध स्पर्धेत उत्कर्ष शेटीया व तेजस कांदळकर प्रथम...छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निशुल्क ऑनलाईन निबंध स्पर्धा पार पडली. स्पर्धेला जिल्ह्यासह राज्यातून शालेय विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये लहान गटात उत्कर्ष शेटीया तर मोठ्या गटात प्रथम तेजस कांदळकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गावात घेण्यात येणारे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करुन, विद्यार्थ्यांना संभाजी महाराजांचे कार्य ज्ञात होऊन त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळण्यासाठी या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही गटासाठी विद्यार्थ्यांना संभाजी महाराज व आजचा युवक, रणधुरंधर संभाजी महाराज व कला, भाषा, साहित्य भूषण संभाजी महाराज हे तीन विषय देण्यात आले होते. या स्पर्धेचे परिक्षण प्रा.रंगनाथ सुंबे यांनी केले. लहान गटात (इयत्ता 5 वी ते 8 वी) प्रथम- उत्कर्ष नितीन शेटीया (केडगाव), द्वितीय- ज्ञानेश्‍वरी सुधीर येणारे (निमगाव वाघा), मोठा गट (इयत्ता 9 वी ते 12 वी) प्रथम- तेजस शंकर कांदळकर (चांदवड, जि.नाशिक), द्वितीय- तेजस मारुती कदम (शिरुर जि. पुणे), तृतीय- साक्षी संजय शेळके (राहुरी), उत्तेजनार्थ- मयुर सिध्दार्थ शिरसाठ (राहुरी) यांनी बक्षिसे पटकाविली. निबंध स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे व सचिव प्रतिभा डोंगरे यांनी दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे, डोंगरे संस्थेच्या सचिव मंदाताई डोंगरे, ऋषीकेश बोडखे, अक्षय ठाणगे, सचिन जाधव, गौतम फलके, सुरेखा जाधव, छाया वाबळे यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News