वाडिया पार्क ते जुनी महानगरपालिका रस्ता डांबरीकरण कामास प्रारंभ


वाडिया पार्क ते जुनी महानगरपालिका रस्ता डांबरीकरण कामास प्रारंभ

-वाडिया पार्क ते जुनी महानगरपालिका रस्ता डांबरीकरण कामाची पाहणी आ.संग्राम जगताप यांनी करुन संबंधितांना सूचना दिल्या. याप्रसंगी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, बंडू  आंबेकर, गणेश भुतारे,  दिपक पवार, राजेंद्र कचरे, नरेंद्र सत्रे, सतीश इंगळे, सोनू चौधरी, गणेश उदारे आदि. (छाया : राजु खरपुडे)
पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण होणार - आ.संग्राम जगताप

     नगर - लवकरच पावसाळा सुरु होणार असल्याने नगर शहरातील सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण व पॅचिंगचे काम पूर्ण करण्यात यावे, याबाबतच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहे. सध्या कोरोनामुळे विकास कामांवर परिणाम झाला असलातरी अत्यावश्यक कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी शासनाकडे जास्त निधीची मागणी करण्यात आलेली असून, त्याद्वारे विकास कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. फेज-2, अमृत योजनेच्या कामांमुळे शहरात विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. आत पाईपलाईन टाकण्याचे कामे पूर्ण होत आली आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.वाडिया पार्क ते जुनी महानगरपालिका रस्ता डांबरीकरण कामाची पाहणी आ.संग्राम जगताप यांनी करुन संबंधितांना सूचना दिल्या. याप्रसंगी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, बंडू  आंबेकर, गणेश भुतारे,  दिपक पवार, राजेंद्र कचरे, नरेंद्र सत्रे, सतीश इंगळे, सोनू चौधरी, गणेश उदारे आदि उपस्थित होते.

     सभापती अविनाश घुले म्हणाले, शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांचे नियोजन करुन त्यादृष्टीने कामे सुरु आहेत, प्रारंभी फेज-2 व अमृत योजनांतर्गत पिण्याची पाण्याची लाईन तसेच ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम झाले आहे. आता शहरातील डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, पावसाळ्यापूर्वीच हे काम पूर्ण करुन चांगले रस्ते तयार करण्यात येणार आहे. कोरोनामुळे सध्या वर्दळही कमी असल्याने ही कामे दर्जेदार होऊन लवकरच पूर्ण होतील. शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आ.संग्राम जगताप यांच्या सहकार्याने विकास कामात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News