गोपाळवाडी गावात जनतेने नियमांचे पालन केल्यामुळे कोरोना आटोक्यात


गोपाळवाडी गावात जनतेने नियमांचे पालन केल्यामुळे कोरोना आटोक्यात

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 दौंड तालुक्यातील गोपाळवाडी हे गाव कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे हॉटस्पॉट वर आले होते, परंतु गावातील लोकांनी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून माझे कुटुंब माझी जबाबदारी याला महत्व देत कोरोना आटोक्यात आणला आहे, यासाठी तत्कालीन प्रोबेशनरी पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांनी गावात सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच गावातील तरुण सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष यांची मीटिंग बोलावली होती त्यानुसार त्यांनी मार्गदर्शन केले होते,त्याची अंमलजावणी करण्यात आली,तसेच दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी ही मार्गदर्शन केले आहे,त्यानुसार पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना दिलासा देऊन त्यांना दौंड येथील कोविड सेंटर येथे पाठविण्यात आले आहे,तसेच रुग्णांच्या घरावर त्यांचे नाव आणि कालावधी लिहून स्टिकर चिकटविण्यास सांगितले होते,BDO अजिंक्य येळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी ही वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे त्यामुळे गावातील रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे,आज 20 मे रोजी गावातील एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आली नाही, ही आनंदाची बाब आहे, आज रोजी गावात एकूण 47 रुग्ण असून त्यापैकी 27 जण होम कॉरेन टाईन आहेत,तर 20 जण पैकी काही कोविड सेंटर येथे आहेत तर काही जण खाजगी दवाखान्यात दाखल झाले आहेत,अशी माहिती गोपाळवाडी उपकेंद्र येथील डॉ पवार मॅम,आरोग्य सेविका शिंदे मॅम,आरोग्य सेवक पोळ यांनी  दिली आहे,यामध्ये सरपंच उपसरपंच सर्व सदस्य,शिक्षक,शिक्षिका,पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच गावातील तरुण सामाजिक कार्यकर्ते यांनी यासाठी काळजी घेऊन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News