अल्कली अमाईन्स कंपनीत क्रेनच्या माघील चाकाखाली सापडून एक कामगार जागीच ठार


अल्कली अमाईन्स कंपनीत क्रेनच्या माघील चाकाखाली सापडून एक कामगार जागीच ठार

कुरकुंभ:प्रतिनिधी सुरेश बागल

कुरकुंभ  (ता. दौंड )औद्योगिक वसाहतीमध्ये  चार ते पाच दिवसात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे चार दिवसांपूर्वी नामांकित कंपनीत एका कामगाराचा विद्युत करंट शॉक लागून मृत्यू झाला .चार दिवसानंतर  औद्योगिक वसाहत मधील अल्कली अमाइन्स या कंपनी मध्ये क्रेन फराना च्या माघील चाकाखाली सापडून एक  कामगार  जागीच ठार (मृत्यू )झाला.

या घटनेनंतर दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन संबंधित बिहारकडे रवाना झाले. या घटनेची माहिती मिळताच दौंड ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलिस हवालदार मारुती हिरवे, राकेश फाळके, दत्तात्रय चांदणे, महेश पवार हजर होते. याप्रकरणी फराना क्रेन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुजित्तकुमार बारेलाल सिंह (वय २१, सध्या रा. कुरकुंभ, मूळ रा. वॉर्ड नंबर ६ मेहसी जोगाटोला, ता. विभूतीपुर, जि. समस्तीपुर, राज्य बिहार) असे मृत्यू झालेल्या हेल्पर कामगाराचे नाव आहे. या घटनेबाबत लतीफ याकुब सय्यद (वय ४६ वर्ष रा, सोनवडी सुपे, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. १७) रोजी पांढरेवाडी गावाच्या हद्दीमधील औद्योगिक वसाहततील अल्कली अमाइन्स कंपनीच्या बॉयलर जवळ असणाऱ्या कंपाऊंडच्या भिंतीजवळ हा प्रकार घडला.याबाबत सुनील रामजुझवल यादव सध्या (रा. कुरकुंभ, ता. दौंड, मूळ रा. दिकतोली, पोस्ट तामाखारा, जि. संतकबीर नगर उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांवर काही कंपन्या घटना दडपण्याचा देखील प्रयत्न करत आहेत . अनेक कंपन्यांमध्ये कामगारांना सेफ्टी, सुरक्षा  दिली जात नाहीत. अशा कंपन्यांवर संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मांगणी कामगार वर्गांमधून आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.या बाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सुनील रामजुझावल यादव हा चालक एम.एच ४२ एक्स ८९९० फराना क्रेनच्या सहाय्याने अल्कली अमाइन्स कंपनीमध्ये स्क्रॅप उचलण्याचे काम करीत होता. त्याचा अचानकपणे या क्रेनवरील ताबा सुटला. चालकाला पुन्हा ताबा मिळवता आला नाही. या दरम्यान कंपनीच्या बॉलर परिसरातील कंपाऊंडला फराना क्रेन धडकले. यावेळी क्रेनमध्ये बसलेला हेल्पर कामगार हा सुजितकुमार बारेलाल सिंह हा खाली पडला आणि क्रेनच्या पाठीमागील डाव्या बाजूच्या चाकाखाली सापडून त्याचा घटनास्थळीच ठार( मृत्यू )झाला. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुशील लोंढे करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News