लोणी भापकरच्या माजी विद्यार्थ्यांकडून ग्रामपंचायतींना मास्क व सॅनिटायझर वाटप


लोणी भापकरच्या माजी विद्यार्थ्यांकडून ग्रामपंचायतींना मास्क व सॅनिटायझर वाटप

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) लोणी भापकर (ता.बारामती) येथील न्यु इंग्लिश स्कूलमधील सन २००७ च्या इयत्ता दहावीतील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनी या परिसरातील ग्रामपंचायतींना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.

लोणी भापकर, सायंबाचीवाडी, पळशी, मासाळवाडी, मुढाळे, तरडोली या ग्रामपंचायतींना सुमारे ३५००० मास्क व ५०० लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. 

  ग्रामीण भागातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मास्क व सॅनिटायझर वापरणे कसे गरजेचे आहे हे गावकऱ्यांना या युवकांनी पटवून दिले. गावात कोणत्याही प्रकारची कमतरता भासल्यास ती पुर्ण करण्यासाठी आम्ही सगळे सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही या युवकांनी दिली.

या उपक्रमासाठी संतोष तांबे, योगेश गोलांडे, अमोल भगत, गौरव नांगरे, चेतन भापकर, गणेश कडाळे, सागर भापकर, अमर मोरे व त्यांचे इतर सहकारी यांनी परिश्रम घेतले. कोरोना या महामारीत जनजागृती करून अशाच प्रकारचे काम अजून आजी माजी विद्यार्थी यांनी पुढे येऊन हाती घ्यावे असा संदेश देण्याचे काम न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर येथील २००७ च्या बॅचने केले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News