बारामती तालुक्यातील श्री स्वामी समर्थ खडी क्रशर बंद करण्याचे प्रदूषण नियामक मंडळाचे आदेश! अखेर मोढवे ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश...


बारामती तालुक्यातील श्री स्वामी समर्थ खडी क्रशर बंद करण्याचे प्रदूषण नियामक मंडळाचे आदेश! अखेर मोढवे ग्रामस्थांच्या  आंदोलनाला यश...

 बारामती : प्रतिनिधी भालचंद्र महाडिक : बारामती तालुक्याच्या मोढवे परिसरातील खडी क्रशर बंद करण्यात यावे यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता. त्याची दखल महाराष्ट्र प्रदूषण प्राधिकरणाने घेतली असून श्री स्वामी समर्थ स्टोन क्रशर, चौधरवाडी (ता.बारामती) यांना प्रदूषण विभागाने खडी क्रशर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सोमेश्वर स्टोन खडी क्रशर आणि वरदराज स्टोन क्रशर यांना परत एकदा सात दिवसांमध्ये आपले म्हणणे मांडावे अशी नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत ताशेरे ही ओढले आहेत व जिल्हाधिकारी गौण खनिज खणी कर्म विभागाने देखील याची दखल घेतली असून बारामती तसेच पुरंदर तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडून अहवाल मागितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दौंड तालुक्याचे निरीक्षक बापुराव सोलनकर व माणिक काळे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे.

 यावेळी सोलनकर म्हणाले की, यामुळे मोढवे परिसरातील शेतकऱ्यांचे, ग्रामस्थांचे खूप मोठे नुकसान झाले आहे, शेतीतील पिकांचे नुकसान होत असून घरांना, मंदिरांना तडे गेलेले आहेत तसेच मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्यामुळे पाण्याची पातळी खाली जाऊन विहिरी कोरड्या पडायला लागल्या आहेत. याठिकाणी धूळ मोठ्या प्रमाणात उडत असल्यामुळे येथील लोकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या खडी क्रशरवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थ करीत होते व आहेत. श्री स्वामी समर्थ स्टोन क्रशरवर कारवाई झाली हे मोढवे येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीचा विजय असल्याचे तसेच अजून सोमेश्वर खडी क्रशर व वरदराज खडी क्रशरवर कारवाई झाली पाहिजे, जोपर्यंत हे दोन्ही क्रशर बंद होत नाहीत तो पर्यंत हा आंदोलनाचा लढा थांबणार नाही असे यावेळी सोलनकर व काळे यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News