मोतीलाल शहा सारखे दानशूर समाजात आहेत म्हणून गोशाळा चालतात


मोतीलाल शहा सारखे दानशूर समाजात आहेत म्हणून गोशाळा चालतात

आचार्य भावे गोशाळेला मोतीलालजी तर्फे कोव्हिडं 19 मध्ये 50 हजाराची मदत.

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

पुणे- आचार्य भावे लोकसेवक संघ संचलित आचार्य विनोबा भावे गोशाळा ,कोयाळी,खेड  यांचे मागील दिडवर्षात कोव्हिडं 19 च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे  230 गाया सांभाळणे खूप जिकरीचे झाले होते 2,4 दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक  आर्थिक मोठी अडचण निर्माण झाली म्हणून त्यांचे निवेदन पेपरला आले होते.ती बातमी वाचून  मोतीलाल शहा (वय 85) सारखे दानशूर तयार झाले , पण त्यांनी प्रत्यक्ष वास्तव बघून देणगी देऊ म्हंटले. मग फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनचे  अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी त्यांचे गाडीतुन जेष्ठसमाजसेवक शहा व  सौ.सुशीलाबेन शहा चॅरिटेबल ट्रस्ट चे मनोज शहा यांना गोशाळेला भेट देण्यासाठी 17 मे 2021 रोजी सकाळी घेऊन गेलें. त्यावेळी गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष दीपक निकम यांनी सर्व वास्तव परिस्थिती दाखविली.पुढे ते म्हणाले की या गोशाळेत काही  कत्तलखाण्यात  जाणारे ,व या  परिसरातील गाई गुरे नाउपयुक्त सांभाळणे अवघड जाते म्हणून शेतकरी गुरे गोशाळेत आणून सोडतात .तसेच आम्ही यासोबत काही दुबती गाई पण  सांभाळतो. अशी एकूण 230 गाई ,गुरे त्यांचे वेळोवेळी डॉक्टर, औषधपाणी ,चारा  कामगार हे  कोव्हिडं 19 सुरू झाले पासून सांभाळणे देखभाल करणे अवघड झाले.देणगीदार पण खूप कमी झाली आहेत आणि  पुढील 4,5 महिने कसे जातील, तातडीने चारा घेणे करीता 1 लाखाची नितांत आहे. 

हे वास्तव माहिती व यापूर्वी ही केलेली मदत आज प्रत्यक्ष अनुभव घेऊन  पाहिल्याने सौ. सुशीलबेन ट्रस्ट तर्फे अध्यक्ष मोतीलालजी शहा यांनी  50हजारांचा धनादेश तसेच शैलेश शहा यांचे कडून रोख 1500 आणि रिटायर्ड पोलीस अधिकारी माधवराव चिरमे कडून रोख 1हजार देणगी यावेळी देण्यात आली.

यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की मोतीलालजी शहा नेहमीच अपंग ,विकलांग व्यक्तीना व्हीलचेअर  देऊन तसेच सामाजिक  संस्थांना नेहमीच मदत करीत असतात. पुढे ढोक म्हणाले की आज आचार्य भावे गोशाळा अत्यन्त अडचणीत असताना स्वतःचे व  इतरांचे मिळून 52500 रुपयांची मोठी मदत केली तसेच  इतरांचे मदतीने  उर्वरित अडचण दूर करण्याची  हमी दिली.  त्यामुळे समाजात अशी मोतीलालजी सारखी दानशूर  मंडळी अडचणीत उपयोगी पडतात म्हणून  निकम साहेबांनी चांगले काम करीत रहावे असा मौलिक सल्ला ढोक  यांनी देऊन फुले एज्युकेशन च्या वतीने या दोघांचेही अभिनंदन व सत्कार करून गोशाळा देखभाल करणारे कटुंब व निकम साहेब यांना  सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे ग्रंथ भेट दिले.

कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक दीपक निकम ,मोलाचे सहकार्य रघुनाथ ढोक,पोलीस अधिकारी संदीप शहा व शेवटी आभार मनोज शहा  यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News