धारिवालांच्या मदतीमुळे शिरूरच्या रूग्णांच्या जीवनात प्रकाश


धारिवालांच्या मदतीमुळे शिरूरच्या रूग्णांच्या जीवनात प्रकाश

शिरूर प्रतिनिधी गजानन गावडे:

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाढलेली रूग्ण संख्या आणि त्यात आॅक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे शिरूरलाही रूग्णांना आॅक्सिजन बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत असल्याचे दिसुन येत होते.रूग्णांचे आॅक्सिजन बेड मिळवण्यासाठी होणारे हाल पहावत नसल्याने एका अदृष्य शक्तीने आॅक्सिजन तसेच फॅबिफ्ल्यू टॅबलेट्सचा मोफत पुरवठा करून देऊन त्याचा सर्व खर्च स्वत: करत आहे.आत्तापर्यंत १०३ रूग्णांना त्यांनी आॅक्सिजन मोफत उपलब्ध करून दिला आहे.हे महान कार्य करून रूग्णांच्या जीवनात प्रकाश टाकणारी अदृष्य शक्ती कोण असावी असा प्रश्न सर्वांना पडला असेल तर ते आहेत प्रसिध्द उद्योगपती व शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल. 

           सर्वत्र आॅक्सिजनचा तुटवटा निर्माण झाल्याने याची झळ शिरूर शहरात देखील जाणवु लागली.त्यामुळे   रूग्णांची व नातेवाईकांचे आॅक्सिजन बेड मिळवण्यासाठी होणारे हाल शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते व उद्योगपती प्रकाश धारिवाल यांना पहावत नव्हते.रूग्णांना काही मदत करता येईल का या विचाराने मनात घालमेल सुरू असतानाच त्यांनी ठरवले की,शहर व परिसरातील रूग्णांच्या आॅक्सिजनचा खर्च स्वतः करणार असल्याबाबत एक महिन्यापुर्वी जाहिर केले.आॅक्सिजनची गरज असलेल्या रूग्णांना त्यांच्या डाॅक्टरांच्या सल्ल्याने विनामुल्य घरपोहच आॅक्सिजन सिलेंडर देण्याच्या कामात प्रकाशभाऊंचे खंदे तसेच विश्वासु समर्थक शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे,माजी सभापती तुकाराम खोले यांच्या समवेत दादाभाऊ लोखंडे,सागर पांढरकामे,विशाल जोगदंड व साजिद खान यांनी येथील डाॅ.संदिप परदेशी यांच्या मार्गदर्शखाली पुढाकार घेत आत्तापर्यंत शहर व परिसरातील आॅक्सिजनची गरज असलेल्या १०३ रूग्णांना घरपोहच आॅक्सिजन सिलेंडर पोहच केले आहे.आॅक्सिजनचा तुटवडा असल्याने दावाखान्यात बेड मिळत नव्हते अशा परिस्थितीत प्रसिध्द उद्योगपती व शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल यांनी शब्दात वर्णन करता न येणा-या केलेल्या महान मदतीमुळे तसेच शितोळे,खोले,लोखंडे,पांढरकामे व जोगदंड या आरोग्यदुतांनी रात्री-अपरात्री वेळेची तमा न बाळगता मदत पोहचविल्याने रूग्ण व नातेवाईकांडुन समाधान व प्रकाशभाऊंच्या रूपाने देव मदतीला धावुन आला असल्याच्या भावना व्यक्त करत आहेत. 

कोविड सेंटरलाही पुरवठा शिरूर शहरात शंभर ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी होत असुन पहिल्या टप्प्यात तीस बेडच्या सेंटरला शासकीय मंजुरी मिळाली आहे.शहरातील या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठ्याचा सर्व खर्च करण्याची तयारीही प्रसिध्द उद्योगपती व शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल यांनी दर्शवली आहे.

ऑक्सिजनची गरज जाणवत राहील तोपर्यंत विनामुल्य आॅक्सिजनचा हा उपक्रम प्रकाशभाऊंच्या मदतीतुन चालूच राहणार असल्याचे शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे,माजी सभापती तुकाराम खोले या कार्यकर्त्यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News