शिक्षकासह वडील आणि बहीण कोरोना बळी,शिक्षक कास्ट्राईब महासंघ आणि डी एड ग्रुप कडून 1,31,111 मदतीचा मिळाला हात


 शिक्षकासह वडील आणि बहीण कोरोना बळी,शिक्षक कास्ट्राईब महासंघ आणि डी एड ग्रुप कडून 1,31,111 मदतीचा मिळाला हात

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड कास्ट्राईब शिक्षक महासंघ व शिवराय डी एड विद्यालय सन 2000 ग्रुपतर्फे कालकथित संतोष कांबळे सरांच्या कुटुंबीयांना रुपये १,३१,१११/_ ची मदत सुपूर्द.

याविषयी माहिती देताना  गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ म्हणाले की कालकथित संतोष विठ्ठल कांबळे उपशिक्षक नवभारत ज्ञानवर्धिनीचे प्राथमिक विद्यामंदिर वारजे माळवाडी पुणे ५८ येथे कार्यरत होते . त्यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . याबरोबरच त्यांचे वडील व एक बहीण यांचे दु :खद निधन झाले . यामुळे संतोष कांबळे सरांच्या कुटुंबावर खुप मोठे संकट आले आहे .तसेच त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य आजारी होते . त्यांच्या उपचाराचा खर्चही खुप झाला आहे . यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ व शिवराय डी.एड . कॉलेज ग्रुप २००० बॅच तर्फे करण्यात आला . त्यांना रुपये १,३१,१११ ची मदत करण्यात आली .मा.आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते मदतनिधीचा धनादेश देण्यात आला . यावेळी मा . महादेव घुले उपमुख्यकार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग, मा . संदिप कोहीनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग , मा . सुनिल कुऱ्हाडे शिक्षणाधिकारी जि.प . पुणे श्रीमती किरण कांबळे मॅडम श्री गौतम कांबळे श्री विठ्ठल सावंत श्री हौशीराम गायकवाड श्री अशोक कदम श्री अमोल जाधव, श्री विजय घिगे श्री दिलीप मोरे  श्री .सलीम तांबोळी , तनपुरे सर  कालकथित संतोष कांबळे यांची बहिण व त्यांचे नातेवाईक या प्रसंगी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News